Headlines

अक्कलकोटचे नूतन बसस्थानक जानेवारीमध्ये प्रवाशांच्या सेवेत:29 कोटींच्या विकासकामाचा आ. कल्याणशेट्टी यांनी घेतला आढावा




श्री स्वामी समर्थांच्या पावन नगरीत येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत नूतन बसस्थानकाच्या कामाचा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष भेटून आढावा घेतला. कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी सक्त तंबी देत हे नवे बसस्थानक जानेवारीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अधिकारी उत्कर्ष करंडे, प्रधुग्न जाधव, इंजिनिअर अमित थोरात, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, मोतीराम राठोड, तम्मा शेळके, मक्तेदार रवी किसन, राजेंद्र बंदिछोडे आदी उपस्थित होते. पाहणी वेळी आ. कल्याणशेट्टी यांनी एसटी महामंडळाचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कामाचा दर्जा, वेळेत पूर्णत्व आणि प्रवाशांच्या सोयी यावर त्यांनी विशेष भर दिला. नवीन व वापरातील बस गाड्यांचा योग्य मेळ घालून नवी घडी बसवली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *