![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. अजितदादांचे राज्याच्या विकासातील योगदान मोठे असून, केवळ पुतळा उभारून त्यांचे कर्तृत्व मर्यादित ठेवू नका. पुणे रिंगरोडला अजित पवार यांचे नाव द्या आणि त्यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेत सत्ता असल्याने अजितदादांना मानणाऱ्या जिल्हा परिषदेतील नेत्यांनी त्यांचा पुतळा उभारला, त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र, अजितदादांमुळे राज्याच्या सत्तेत मंत्रीपदे उपभोगणाऱ्यांना पुणे रिंगरोडला त्यांचे नाव द्यावे, असे वाटत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अमित शहांनी घोषणा करावी रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांनी राज्याच्या विकासात अमूल्य योगदान दिले. तसेच दशकभराहून अधिक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. असे असतानाही त्यांच्या नावाने एखादा मोठा प्रकल्प ओळखला जाऊ नये, अशी काही व्यक्तींची भूमिका आहे का, असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला.केवळ पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमापुरते अजितदादांचे स्मरण न ठेवता पुणे रिंगरोडला त्यांचे नाव देण्याची आणि त्यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा अमित शहा यांनी करावी. अन्यथा अजित पवार यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रिंगरोडला त्यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, अजित पवार यांचा घात झाला की तो अपघात होता, याबाबतचे सत्य समोर आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
Source link
केवळ पुतळा उभारून कर्तृत्व मर्यादित ठेवू नका:पुणे रिंगरोडला अजित पवारांचे नाव द्या, अन्यथा पुण्यतिथीला मोठे आंदोलन- रोहित पवार