Headlines

BJP Navnath Ban Slams Sanjay Raut; Rahul Gandhi Disrespects Balasaheb


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा काँग्रेसच्या एकाही नेत्याने साधे श्रद्धांजलीचे ट्विट न केल्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत

.

इंदिरा-राजीव गांधींना आदरांजली वाहता, मग बाळासाहेबांच्या अपमानावर गप्प का?

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या जयंती व पुण्यतिथीला न चुकता आदरांजली अर्पण करतात. मात्र, ज्या काँग्रेसने आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारांचा द्वेष केला, त्यांच्या नेतृत्वापुढे आज ठाकरे गट लांगूलचालन करत आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली नाही तरी त्यांचे मोठेपण कमी होत नाही, हे खरे असले तरी तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात त्यांनीच बाळासाहेबांचा अपमान केला, याचा जाब उद्धव आणि आदित्य ठाकरे काँग्रेसला विचारणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत अर्थशास्त्री नव्हे तर कामशास्त्री -नवनाथ बन

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा बन यांनी आकडेवारीसह समाचार घेतला. यंदाच्या दिवाळीत देशातील सर्वसामान्य जनतेने तब्बल 7 लाख कोटी रुपयांची खरेदी केली आहे. ही खरेदी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलेल्या लोकांनी केली का, असा उपरोधिक प्रश्न बन यांनी विचारला. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भारताची अर्थव्यवस्था 13 व्या ते 14 व्या क्रमांकावर होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आज जगात 4 थ्या क्रमांकावर पोहोचली आहे. संजय राऊत अर्थशास्त्री नसून ते कामशास्त्री आहेत, त्यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

तिरंग्याचा इतिहास आणि 2002 चा निर्णय

परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे राष्ट्रप्रमुखांच्या रांगेत तिरंगा पायाखाली तुडवला जाण्यापासून वाचला, याचा 140 कोटी भारतीयांना अभिमान आहे. तसेच, 50 वर्षे कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही अशी टीका करणाऱ्या राऊतांनी संपादक या नात्याने इतिहास तपासावा. 26 जानेवारी 2002 पूर्वी काँग्रेस सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खाजगी घरे किंवा ‘सामना’सारख्या कार्यालयांवर तिरंगा फडकवण्याचा अधिकारच दिला नव्हता; अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 26 जानेवारी 2002 रोजी शासन निर्णय काढून हा अधिकार दिला, अशी आठवण बन यांनी करून दिली. भाजप ‘हर घर तिरंगा’ राबवते, तर उबाठा गटाने ‘हर घर वसुली’ अभियान राबवले, अशी टीका त्यांनी केली.

1000 कोटींचा पत्राचाळ घोटाळा करणारे राऊत; फडणवीसांचे मुंबईत साधे घरही नाही

मुंबईतील 300 एसआरए प्रकल्पांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या संजय राऊत यांच्यावर बन यांनी जोरदार पलटवार केला. “देवेंद्र फडणवीस गेल्या 10 ते 12 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, तरीही त्यांचे मुंबईत साधे घर किंवा फ्लॅट नाही. याउलट संजय राऊत यांनी पत्राचाळमध्ये 1000 कोटी रुपयांचा घोटाळा करून 100 दिवस आर्थर रोड तुरुंगात काढले आणि बिल्डरांच्या आशीर्वादाने भांडूपमध्ये आलिशान बंगला व अलिबागमध्ये 19 बंगले बांधले, तर उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री 2’ उभारले,” असे बन म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे यांनी बीडीडी चाळीतील घरांची किंमत 50 लाख रुपये ठेवून मराठी माणसाला कल्याण-डोंबिवलीकडे हद्दपार करण्याचा डाव आखला होता. मात्र, फडणवीस सरकारने परवडणाऱ्या दरात तिथेच घरे दिली आणि वांद्रे, जुहू, वर्सोवा येथील 10 बाय 10 च्या झोपडीत राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 305 चौरस फुटांचे हक्काचे घर देण्याचे काम सुरू केले आहे. 100 दिवस तुरुंगात जाऊनही खासदारकीचा राजीनामा देण्याची नैतिकता न दाखवणाऱ्या राऊतांचे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे स्वप्न पुढच्या 100 जन्मांतही पूर्ण होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

‘ऑपरेशन टायगर’साठी राऊतांनी अश्लील शब्द तयार ठेवावेत

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, जेव्हा 40 आमदार आणि नंतर 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेनेत आले, तेव्हा संजय राऊत यांना साधा थांगपत्ताही लागला नव्हता. ऑपरेशन झाल्यावर राऊत दोन्ही हातांनी बोंब मारत अश्लील भाषेत शिवीगाळ करतात. त्यामुळे आगामी ‘ऑपरेशन टायगर’साठी त्यांनी आत्ताच शिव्या तयार ठेवाव्यात, जनता त्यांना मतांच्या रूपाने उत्तर देईल. तसेच, उदय सामंत यांच्या पक्षांतरावर बोलणाऱ्या राऊतांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या पक्षात आलेल्या भास्कर जाधवांचा इतिहास पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकरी मदत आणि अलिबाग दुर्घटनेवर सरकारची भूमिका

विदर्भात गेल्या 1.5 महिन्यात 155 शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या प्रश्नावर बोलताना बन यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना केवळ 2500 रुपये दिले, तर महाराष्ट्रातील महायुती सरकारने दिवाळीपूर्वी 1.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5000 रुपये जमा केले आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला. शरद पवार कृषिमंत्री असताना यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांची राजधानी बनली होती; आज शेतकऱ्यांना दिवसा 20 तास वीज, सौर कृषी पंप, शेततळी आणि चारा छावण्या दिल्या जात आहेत, असे ते म्हणाले. तसेच, अलिबागमध्ये वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी दोषी पोलीस किंवा स्थानिक प्रशासनावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही नवनाथ बन यांनी केली.

——————————————–

हेही वाचा…

पुढला बॉम्ब टाकेन तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल: 300 एसआरए प्रकल्पांच्या घोटाळ्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील 2 ते 3 बिल्डरांसाठी नियमात न बसणारे तब्बल 300 प्रकल्प एसआरएमध्ये घुसवले जात असून, यातून राज्याचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. मी जेव्हा या प्रकरणाचा पुढला बॉम्ब टाकेन, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल,” असा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे. बुधवारी (18 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे पत्र, रुपयाची घसरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परदेश दौरा आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.