Headlines

चंद्रपूरच्या गजबजलेल्या चौकात पुरुषाचे कापलेले शीर आढळल्याने खळबळ:उड्डाणपुलाखाली सापडले धड; पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान




चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात एका अज्ञात पुरुषाचे धडापासून वेगळे केलेले शीर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरवस्तीत घडलेल्या या क्रूर घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशत पसरली असून, या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. सकाळच्या सुमारास इंदिरा गांधी चौकातील सुशोभीकरण केलेल्या पुतळ्यामागे एका पुरुषाचे कापलेले शीर पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. गजबजलेल्या परिसरात असे भयावह दृश्य पाहून नागरिक हादरून गेले. याबाबत पोलिसांना तात्काळ कळवण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक लॅबची टीम आणि श्वानपथकाने घटनास्थळी धाव घेतली. फलकाच्या खांबाजवळ धड पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसराला वेढा घालून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. श्वानपथकाच्या मदतीने आजूबाजूच्या भागात कसून शोधमोहीम राबवण्यात आली. श्वानाने दाखवलेल्या मार्गावरून पोलिसांनी माग काढला असता, चौकापासून काही अंतरावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली असलेल्या एका जाहिरात फलकाच्या खांबाजवळ या पुरुषाचे उर्वरित धड मिळून आले. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या अज्ञात व्यक्तीचा इतरत्र कोठेतरी निर्घृण खून करून, पुरावे नष्ट करण्यासाठी आणि शहरात भीती निर्माण करण्याच्या हेतूने शीर व धड शहराच्या मध्यभागी वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले असावेत, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातून शोध मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले जात आहे. पोलीस प्रशासन या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *