Headlines

शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या टोकन सिस्टीमचा बोजवारा:यंत्र बंद पडल्याने पक्षांचे घरटे अन विष्ठांचा खच, लाखो रुपये पाण्यात; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी




हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या टोकन सिस्टीमचा बोजवारा उडाला असून यंत्रणाच बंद असल्याने त्यावर पक्षांचे घरटे झाले असून काही ठिकाणी चक्क पक्षांच्या विष्ठा त्यावर पडल्या आहेत. त्यामुळे रांगेपासून सुटका करण्याच्या उदात्तहेतून सुरु केलेल्या सिस्टीमच बंद पडल्याने रुग्णांच्या रांगा कायम आहेत. तर या सिस्टीम उभारणीसाठी केलेल्या लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी रांगा लागत आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच गरोदर महिलांना देखील रांगेत उभे रहावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होऊ लागली होती. यावर उपाय योजना म्हणूून वैद्यकिय महाविद्यालय प्रशासनाने टोकन सिस्टीम सुरु केली. यामध्ये रुग्णांनी टोकन घेतल्यानंतर त्यांच्या टोकनची उद्घोषणा झाल्यानंतर त्यांनी तपासणीसाठी येणे अपेक्षीत होते. तोपर्यंत रांगे उभे न राहता बसण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र मोठा गाजावाजा करून सुरु केलेल्या टोकन सिस्टीमच्या अवघ्या एका महिन्यातच बोजवारा उडाला. टोकन सिस्टीमचे यंत्रच बंद अवस्थेत असून सध्या हे यंत्र धुळखात पडले आहे. ज्या ठिकाणावरून टोकन घ्यावयाचे त्या ठिकाणी यंत्रावर चक्क पक्षांचे घरटे दिसू लागले असून यंत्रावर पक्षांच्या विष्ठांचा खच पडला आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर टोकन नको पण घाण आवरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. पक्षांच्या विष्ठांमुळे रुग्णांच्या आरोग्यावरच धोका निर्माण झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. या सिस्टीमच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र या सिस्टीमचाच बोजवारा उडाल्याने रुग्णांच्या रांगा कायम आहेत तर या यंत्रणांसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. या प्रकारामुळे रुग्ण व नातेवाईकांमधून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी- निनाजी कांडेलकर सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर म्हणाले, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचा कारभार चांगलाच ढेपाळला आहे. रुग्णांची गैरसोय कायम आहे. टोकन सिस्टीमवर लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी पुढील काळात आंदोलन केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *