Headlines

Pune Protest: Thackeray Group Tears Shinde & Shaina NC Posters


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधासाठी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पोस्टर फाडण्याच्या कृतीवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान शायना एन.सी. यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्

.

सावरकरांच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद; फोटो फाडण्याच्या कृतीने वाद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी मुंबईत सोनिया गांधी लिखित ‘Belonging – A Journey of Love’ या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा मजकूर असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. याच निषेधार्थ पत्रकार परिषदेत पुस्तकाच्या काही प्रती आणि त्यातील पाने फाडण्यात आली.

यावेळी प्रवक्त्यांकडून पुस्तक फाडण्याची कृती सुरू असताना शायना एन.सी. यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पान फाडल्याचा आरोप झाला. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. शिवसेना ठाकरे गटाने या कृतीचा निषेध करत शिंदे गटाला लक्ष्य केले.

पुण्यात ठाकरे गटाचे आंदोलन; पोस्टर फाडून नदीत विसर्जन

मुंबईतील पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकाराचे पडसाद पुण्यात उमटले. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि शायना एन.सी. यांच्याविरोधात आंदोलन केले. दोघांचे पोस्टर फाडून त्यांचा निषेध करण्यात आला. त्यानंतर फाडलेल्या पोस्टरचे मुठा नदीत विसर्जन करत संताप व्यक्त करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप हा आंदोलनामागील प्रमुख मुद्दा होता. या घटनेमुळे ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

शायना एन.सी. यांनी काय स्पष्टीकरण दिले?

पत्रकार परिषदेत फोटो फाडताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याचे लक्षात आल्यानंतर शायना एन.सी. या अर्ध्यावर थांबल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घटनेवरून वाद वाढल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले.

आपण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडलेला नसून मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचे शायना एन.सी. यांनी म्हटले. तसेच, मणिशंकर अय्यर यांचा फोटो एकदा नव्हे, तर 10 वेळा फाडू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिंदे यांनी शायना एन.सी. यांना विधानभवनात बोलावले?

या वादानंतर शायना एन.सी. विधानभवनात पोहोचल्याची माहिती समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार परिषदेत झालेल्या फोटो फाडण्याच्या प्रकारावरून त्यांच्यात चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सावरकरांच्या कथित अपमानाच्या निषेधासाठी आयोजित पत्रकार परिषदेतून नवा राजकीय वाद निर्माण झाला असून, पुण्यात ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

——————————————————

हेही वाचा…

सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.