Headlines

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास तिन्ही पक्ष एकवटणार:छगन भुजबळांचा विरोधकांना इशारा




मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात चुकीची वक्तव्ये किंवा आरोप करणाऱ्यांना महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन प्रत्युत्तर देणार, असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. लोकशाहीच्या नावाखाली कोणालाही काहीही बोलण्याची मुभा असू शकत नाही. मर्यादा ओलांडून वक्तव्य करणाऱ्यांचा मुकाबला तिन्ही पक्षांचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते एकत्रितपणे करतील, असे भुजबळ म्हणाले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीमधील नेत्यांना एकमेकांविरोधात वक्तव्ये न करण्याचे आवाहनही केले. महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी आपापसातील मतभेद सार्वजनिक व्यासपीठावर मांडण्याऐवजी वरिष्ठ नेतृत्वाकडे मांडावेत, अशी भूमिका भुजबळांनी स्पष्ट केली. एखाद्या विषयावर नाराजी किंवा अडचण असेल तर मुख्यमंत्री अथवा संबंधित नेत्यांशी चर्चा करावी. मात्र, एकमेकांविरोधात वावगे बोलणे टाळले पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात चुकीचे आरोप किंवा वक्तव्ये केली जात असतील, तर तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याला उत्तर देतील, असे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर चर्चा दरम्यान, दुष्काळी परिस्थिती, जलसंधारण आणि शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती भुजबळांनी दिली. समितीच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला दादा भुसे, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन आणि छगन भुजबळ उपस्थित होते. सर्व पक्षांनी दुष्काळी भागात आवश्यक कामे करण्यावर भर दिला. मनरेगा अंतर्गत कामे, जलसंधारणाच्या उपाययोजना आणि शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचवता येईल, याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना अग्रीम मदतीची रक्कम मिळाली नसेल, तर संबंधित अडचणी तातडीने दूर करून मदत पोहोचवण्याची गरज असल्याचे भुजबळ म्हणाले. मदतीची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकसहभागही वाढवण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समित्या आणि महामंडळांच्या नियुक्त्यांवर भर जिल्हा नियोजन समित्यांच्या स्थापनेची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित सदस्यांची नावे देण्याबाबतही चर्चा झाली. डीपीडीसीच्या कामकाजाला गती देण्यासाठी सर्वांनी लवकर कार्यरत होणे आवश्यक असल्याचे भुजबळांनी सांगितले. तसेच विविध महामंडळांवरील नियुक्त्याही लवकर करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी सभासदांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी सरकारच्या कामकाजात समन्वय राखावा आणि सार्वजनिक स्तरावर एकमेकांविरोधात टीका-टिप्पणी टाळावी, असा संदेश भुजबळांच्या वक्तव्यातून देण्यात आला. सरकारमधील मतभेद चर्चेतून सोडवावेत, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात मर्यादा ओलांडून आरोप झाल्यास तिन्ही पक्ष एकत्रित भूमिका घेतील, असा इशारा त्यांनी दिला. हेही वाचा… सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *