![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ४२ कलावंतांच्या संघाची २२ व्या ‘इंद्रधनुष्य’ राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक येथे होणाऱ्या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यापीठाचा संघ बुधवारी रात्री रवाना झाला. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी ही माहिती दिली. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात राज्यातील २८ विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. नाट्य, नृत्य, साहित्य, संगीत आणि ललित कला या पाच कला गटांतील एकूण २८ कला प्रकारांमध्ये स्पर्धा रंगणार आहेत. विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संघाची निवड करण्यात आली. बुधवारी रात्री संघ रवाना होताना प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. संजय कवडे, डॉ. आनंद देशमुख, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे, गजानन पालकर आणि हरिश्चंद्र साठे यांची उपस्थिती होती. संघासोबत सांस्कृतिक समन्वयक गौतम सोनवणे, संघ व्यवस्थापक डॉ. गणेश शिंदे, डॉ. प्रेषित रुद्रवार, कविता दिवेकर, संकेत राजपूत, रामा पडुळे, सागर जोशी, राज मुंगसे, संजय जाधव, प्रदीप कांबळे, पवन शिंदे, पार्थ दायमा, सागर काटे आणि बाळू बोटुळे आदी सहभागी झाले आहेत.
Source link
इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी विद्यापीठाचा 42 कलावंतांचा संघ रवाना:नाशिकमध्ये 20 ते 23 नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा; 28 विद्यापीठांचा सहभाग