Headlines

शहराच्या स्वच्छतेला मिळणार वेग; दहा नव्या घंटागाड्या दाखल:मोठ्या क्षमतेच्या गाड्यांमुळे कचरा संकलन होणार अधिक जलद




शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत आणखी दहा मोठ्या घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. एजन्सीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या घंटागाड्यांमुळे शहरातील कचरा संकलनाला गती मिळणार असून, एकाच वेळी अधिक कचरा उचलणे शक्य होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. नव्याने दाखल झालेल्या दहा घंटागाड्यांची आमदार जगताप यांनी पाहणी करून कचरा संकलन व्यवस्थेची माहिती घेतली. या घंटागाड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करण्यासाठी स्वतंत्र कप्प्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुढील व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे. आमदार जगताप म्हणाले की, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रभावी कचरा संकलन व्यवस्था आवश्यक आहे. मोठ्या क्षमतेच्या घंटागाड्यांमुळे अधिक प्रमाणात कचरा संकलित करता येईल. परिणामी कचरा उचलण्याचा वेळ कमी होऊन नागरिकांना अधिक चांगली सेवा देता येईल. नागरिकांनी घरातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवून घंटागाडीतील संबंधित कप्प्यांमध्येच टाकावा. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास त्याची विल्हेवाट लावणे आणि पुनर्वापर करणे सोपे होईल. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक विपुल शेटीया, गोरख पडोळे, वृषभ भंडारी उपस्थित होते. घंटागाड्यांची वैशिष्ट्ये .दहा मोठ्या क्षमतेच्या घंटागाड्या उपलब्ध. .ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कप्पे. .एकाच फेरीत अधिक कचरा संकलित करण्याची सुविधा. .शहरातील कचरा संकलनाला मिळणार गती. .स्वच्छतेसाठी नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *