- Marathi News
- National
- Meta Has Changed The ‘air’… Leaders’ Reach Has Decreased, But Parties’ Followers Have Increased, Big Change In Political Likes, Comments, Shares On Instagram
मुकेश कौशिक5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

भारतात इन्स्टाग्रामवर राजकीय पोस्टची पोहोच आणि त्यावरील लोकांच्या प्रतिक्रियांमध्ये (लाइक, कमेंट, शेअर) मोठा बदल झाला आहे. यामुळे पंतप्रधानांपासून ते मोठ्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत आणि विरोधी नेत्यांच्या खात्यांवरील लोकांची सक्रियता कमी झाली आहे. मात्र, रंजक बाब म्हणजे मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप या दोन्ही पक्षांच्या अधिकृत खात्यांशी जोडल्या जाणाऱ्या लोकांची (फॉलोअर्सची) संख्या वाढली आहे.
हा बदल अशा वेळी झाला आहे, जेव्हा इन्स्टाग्रामची मूळ कंपनी ‘मेटा’ने भारतासाठी आपल्या ‘रिकमंडेशन सिस्टीम’मध्ये बदल केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, आता ती एआयच्या मदतीने अश्लील आणि हिंसक मजकुराची ओळख पटवत आहे. असा मजकूर लोकांना सुचवणे मर्यादित केले जात आहे. या बदलानंतर भारतीय युजर्सच्या तक्रारी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास निम्म्या झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र, पक्षांचे फॉलोअर्स किती वाढले, किती पोस्टची पोहोच रोखली गेली आणि किती खात्यांवर याचा परिणाम झाला, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. तसेच, राजकीय आणि बातम्यांशी संबंधित मजकुराच्या दृश्यमानतेत काय बदल झाला, यावरही कंपनी गप्प आहे.
मुलांसमोर राजकीय हिंसक कंटेंट येणे थांबेल
अल्गोरिदम व‘रिकमेंडेशन’चे काय?
इन्स्टाग्रामवर दोन प्रकारचे नियम काम करतात. पहिला, कम्युनिटी स्टँडर्ड््स, जे ठरवते की कोणती पोस्ट प्लॅटफॉर्मवर राहील किंवा हटवली जाईल. दुसरा, रिकमेंडेशन गाइडलाइन्स, जी ठरवते की कोणती पोस्ट ‘एक्सप्लोअर’ किंवा ‘रील्स’द्वारे अशा लोकांनाही दाखवली जाईल, जे त्या अकाउंटला फॉलो करत नाहीत.
नेत्यांची एंगेजमेंट का घसरली?
जेव्हा एखाद्या नेत्याची पोस्ट केवळ त्यांच्या सध्याच्या फॉलोअर्सपुरती मर्यादित राहते आणि व्हायरल (रिकमेंड) होत नाही तेव्हा त्यावर येणारे लाइक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज (एंगेजमेंट) घसरतात. जेव्हा अल्गोरिदम स्वतःहून राजकीय कंटेंट दाखवणे कमी करतो तेव्हा युजर्सना ताज्या अपडेट्ससाठी पक्षांच्या अधिकृत अकाउंट्सना फॉलो करावे लागते.
अल्गोरिदम बदलाचा काय फायदा?
हे सोप्या शब्दांत असे समजा की, इन्स्टाग्रामवर आता एआय पूर्वीपेक्षा जास्त कडकपणे काम करेल. ते अश्लील व हिंसक पोस्टची ओळख पटवून त्या नवीन लोकांना दाखवण्यापासून रोखेल. अशा पोस्ट प्लॅटफॉर्मवर तर राहतील, पण व्हायरल होणार नाहीत.
सामान्य युजर्सवर काय परिणाम?
थेट परिणाम इन्स्टाग्राम ‘रील्स’, ‘एक्सप्लोअर’ आणि ‘सजेस्टेड पोस्ट’वर दिसेल. आता तुम्हाला अशा अनोळखी अकाउंट्सच्या आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक, राजकीय पोस्ट कमी दिसतील, ज्यांना तुम्ही फॉलो करत नाही.
या बदलामागे सरकारचा दबाव आहे का?
भारत सरकारने १० ऑक्टोबर रोजी मेटाला आपल्या रिकमंडेशन सिस्टीमचा आढावा घेण्यास सांगितले होते. त्यानंतर ५ आठवड्यांनी मेटाने हा बदल केला. कंपनीचा दावा आहे की, ती एका वर्षापासून यावर काम करत होती.
राजकीय बातम्या, पाेस्टवर बंदी येईल का? मेटाने राजकीय पोस्टवर थेट कोणत्याही बंदीची गोष्ट केलेली नाही. परंतु, जेव्हा अल्गोरिदम कडक होतो, तेव्हा अनेकदा एआय चुकून गंभीर बातम्या किंवा राजकीय चर्चांनाही संवेदनशील मानून त्यांची पोहोच कमी करते.
पत्रकार-डिजिटल तज्ज्ञांची चिंता काय? ऑक्टोबरमध्ये १७४ पोस्ट, ५९ अकाउंट्सवर कारवाई झाली, ज्यामध्ये पत्रकारही होते. तज्ज्ञांचे मत आहे की, एआयच्या चुकीमुळे योग्य बातम्या दाबल्या जाऊ शकतात, त्यामुळे चुकीचे निर्णय सुधारण्याची यंत्रणा असावी.