![]()
समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ चॅनल क्रमांक ४२४, नायगाव शिवारात (सावंगी इंटरचेंजजवळ) मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी ताशी १०० किमी वेगात असलेल्या खासगी एसी डिलक्स स्लीपर बसला (एमपी ४१ झेडएच ९९५५) अपघात झाला. चालक प्रवीण शिवाजी राजेकरला (रा. मुंगळा, ता. मालेगाव, जि. यवतमाळ) डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून बस पुलाच्या कठड्याला आदळून उलटली. या अपघातात विनोद उत्तम जाधव (३५, रा. घोणसरा, आर्णी) आणि रघुनंदन दत्ता सांगडे (२७, रा. मंगूर, यवतमाळ) यांचा मृत्यू झाला, तर ३० प्रवासी जखमी झाले. यापैकी १८ जण जबर, १२ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. डॉक्टरांनी ४ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. यात मरण पावलेले विनोद जाधव ७० फूट खाली फेकले गेले होते. यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या या बसमध्ये प्रवाशांकडून १,८०० ते १,९०० रुपये भाडे आकारून केबिनमध्ये १२ प्रवाशांना कोंबले होते. बॉक्समध्ये झोपलो असतो तर मेलो असतो आरटीओ किंवा पोलिसांनी ओव्हरसीटिंगला अडवू नये म्हणून चालक व सहकाऱ्याने केबिनमधील आम्हा १२ जणांना शंभर-दोनशे मीटर पायी पुढे चालवले. प्लायवूड व स्पंजच्या बॉक्समध्ये झोपलो असतो तर मेलो असतो. – देवानंद राठोड, प्रवासी केबिनमधील प्रवाशांना चालकाने पायी चालवले प्रवासादरम्यान चहासाठी बस थांबली असता आरटीओ किंवा पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने चालक व सहकाऱ्याने केबिनमधील १२ प्रवाशांना शंभर-दोनशे मीटर पायी पुढे चालण्यास सांगितले. कर थकीत अन् ३७,५०० रुपयांचा दंड बाकी पांडे अँड गुल्हाणे यांच्या मालकीच्या या बसची नोंदणी १० जानेवारी २०२५ रोजी देवास (म.प्र.) येथे झाली आहे. ई-चलान पोर्टलवर या बसची केबिनमध्ये आसन क्षमता केवळ ‘१’ असूनही १२ प्रवासी कोंबले होते. बसचा कर ३१ जुलै २०२६ रोजीच संपला असून फिटनेस मुदतीची नोंद नाही. शिवाय भिवंडी, माटुंगा व दहिसर येथील ‘नो पार्किंग’व ‘सीट बेल्ट’ उल्लंघनाचा ३७ हजार ५०० रुपयांचा दंड प्रलंबित असतानाही ही बस महामार्गावर धावत होती.
Source link
संभाजीनगरजवळ चालकाला डुलकी लागल्याने बसची कठड्याला धडक:चालकाच्या केबिनमध्ये कोंबले 12 प्रवासी; ‘समृद्धी’वर ट्रॅव्हल्स बस उलटून दोघांचा मृत्यू