![]()
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जातात. दरम्यान, या योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्र
.
वाटद (खंडाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना त्यांनी योजनेच्या भवितव्याबद्दल ठाम भूमिका मांडली. “लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार आहे, ही योजना कुणीही बंद करू शकत नाही,” असे सामंत यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या आरोग्यासाठी हक्काचे पैसे गरजेचे
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, महिलांच्या आरोग्यासाठी त्यांच्याकडे हक्काचे पैसे असायला हवेत आणि याच उद्देशाने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना न्याय देण्याचीच राज्य सरकारची ठाम भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
2100 रुपयांची ‘योग्य वेळ’ कधी येणार?
विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने सत्तेत आल्यास 1500 रुपयांचा लाभ वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुका होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरी अद्याप महिलांना वाढीव रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे 2100 रुपये नेमके कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. महायुतीचे नेते वारंवार दिलेला शब्द पाळण्याचे सांगत असले आणि आता सामंत यांनीही योग्य वेळी पैसे देण्याचे म्हटले असले, तरी ही ‘योग्य वेळ’ नेमकी कधी येणार याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.