Headlines

बंटी पाटलांनी राहुल गांधींना फोन लावून डिलिमिटेशनला पाठिंबा द्यायला सांगावं: कोल्हापुरातील मेळाव्यात मुश्रीफांची जोरदार फटकेबाजी



देशात सध्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकीय घमासान सुरू असून काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला आहे. नेमका हाच धागा पकडत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मिश्किल टोला लगा

.

कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुष्काळाच्या मुद्द्यावर एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस पक्षासह सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विशेष म्हणजे, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासूनच मुश्रीफ आणि पाटील या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय वितुष्ट निर्माण झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे आभार मानले आहेत. या संदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पाठिंबा दिल्यामुळे मी त्यांचे स्वागत करतो. या विधेयकामुळे महिलांना मोठी संधी मिळणार आहे. इतक्या मोठ्या मतदारसंघात लोकप्रतिनिधींना फिरणे अवघड होते. आता ती समस्या सुटण्यास मदत होईल.

भविष्यात शरद पवार यांचा पक्ष महायुतीत येणार की नाही ते माहिती नाही, मात्र मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मुश्रीफ यांनी निषेध नोंदवला असून, संजय राऊत यांनी केलेल्या 150 कोटींच्या आरोपांवरही त्यांनी जोरदार टीका केली.

मुश्रीफांच्या समोरच के. पी. पाटील यांचा राज्य सरकारला घरचा आहेर

दुसरीकडे, याच कार्यक्रमात बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला चांगलाच घरचा आहेर दिला. शक्तिपीठसाठी जमीन देण्यासाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात आहे, असे सांगत पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीतच त्यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने मुश्रीफ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र “मुश्रीफ साहेब बोलू द्या,” असे म्हणत अजितदादांच्या माजी आमदाराने भरमेळाव्यात सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *