Headlines

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय: सर्व लोकसभा खासदारांना ‘व्हीप’ जारी, 29 तारखेला पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक


केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाणार असून, भाजपने या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या विधेयकाला कडाडून विरोध दर्शव

.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या सर्व लोकसभा खासदारांना ‘व्हीप’ जारी करण्यात आला आहे. 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता दिल्ली येथे संसदीय पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. या बैठकीत 132 वे घटनादुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर सविस्तर चर्चा होणार आहे.

व्हीपचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत दोन्ही विधेयकांबाबत पक्षाची अंतिम भूमिका आणि रणनीती ठरवली जाणार आहे. बैठकीला अनुपस्थित राहण्यासाठी खासदारांना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक करण्यात आले असून, व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या खासदारांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांच्याकडून हा तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे.

विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही- संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या विधेयकाला पाठिंबा दर्शवला असल्याने राऊत यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे महाराष्ट्रद्रोही आणि राष्ट्रद्रोही विधेयक असल्याचे सांगत, या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, भविष्यात आम्ही राष्ट्रवादीला धडा शिकवू, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

‘आधी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची माफी मागा’

दरम्यान, या विधेयकाला पाठिंबा दिल्यावरून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, तुम्ही भाजपला मदत करणार असाल तर आधी तुम्ही अनिल देशमुखांची माफी मागितली पाहिजे. भाजप आणि शहामुळे ते तुरुंगात गेले. तुम्ही नवाब मलिक यांचीही माफी मागितली पाहिजे. तेव्हा मलिक महत्त्वाचे नेते होते. हे दोन्ही नेते अमित शाह आणि मोदींच्या प्रवृत्तींविरोधात लढत होते. त्यांच्यामुळे या दोन्ही नेत्यांना तुरुंगात जावे लागले, असे राऊत यांनी म्हटले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.