![]()
वैजापूर मुलाची भेट घेऊन दुचाकीवरून गावी परतणाऱ्या वृद्ध पती-पत्नीच्या प्रवासाचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघेही कंटेनरखाली चिरडले जाऊन जागीच ठार झाले. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वैजापूर-गंगापूर मार्गावरील गंगापूर चौफुलीजवळ घडली. पुंडलिक कचरू रोकडे (६५) आणि पार्वताबाई पुंडलिक रोकडे (६०, दोघे रा. रहाडी, ता. येवला, जि. नाशिक) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक रोकडे हे पत्नी पार्वताबाई यांच्यासह सोमवारी सकाळी मुलाची भेट घेण्यासाठी गेले होते. मुलाची भेट घेतल्यानंतर दोघेही सायंकाळी दुचाकीवरून आपल्या रहाडी गावाकडे परतत होते. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास ते वैजापूर-गंगापूर मार्गावरील गंगापूर चौफुलीजवळ पोहोचले असता समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही कंटेनरच्या चाकाखाली चिरडले गेले. गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Source link
वैजापूरच्या गंगापूर चौफुलीजवळ पती-पत्नीला कंटेनरने चिरडले:दोघांचा जागीच मृत्यू; जांबरगावजवळ कंटेनर पकडला