Headlines

कौशल्याच्या बळावर उद्योजक व्हा:येवला आयटीआयमध्ये पदवीदानप्रसंगी गायकवाड यांचे आवाहन




औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत केवळ शैक्षणिक प्रमाणपत्र पुरेसे नसून, प्रत्यक्ष कामातील कौशल्य, गुणवत्ता, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी रोजगार, स्वयंरोजगार व उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असे आवाहन संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य मंगेश गायकवाड आणि प्रसिद्ध सिव्हिल इंजिनिअर व कंत्राटदार मनोज बोरसे यांनी केले. महात्मा येथील महात्मा ज्योतिबा फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्य ा पदवीदान समारंभात ते बोलत होते. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य मंगेश गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल इंजिनिअर मनोज बोरसे उपस्थित होते. तसेच संस्थेचे स्थानिक प्राचार्य डी. एल. मगर, मुख्य लिपिक रावसाहेब शिंदे आणि सहायक अधिव्याख्याता व्ही. के. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्राचार्य डी. एल. मगर यांनी संस्थेच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षण कार्याचा आढावा घेतला. संस्थेतून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. भविष्यात विद्यार्थ्यांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन वरिष्ठ निदेशक विनिता शिरसाठ, प्राजक्ता गायकवाड व समीना इनामदार यांनी केले, तर निदेशक आप्पासाहेब उगले आणि नितीन तायडे यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *