कोणताच पक्ष कोणाची बी टीम नसतो, प्रत्येकाचे आपले वेगळे अस्तित्व आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. एखाद्या पक्षाला विरोध किंवा पाठिंबा दिला म्हणून त्यावर तातडीने बोलणं योग्य नाही, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. अंजली आंबेडकर यांनी शरद
.
मीरा-भाईंदरमधील मांसाहार बंदीच्या निर्णयाच्या प्रश्नावर बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की, आगरी-कोळी समाजाचे मासे हे प्रमुख खाद्य आहे; त्यावर बंदी आणणे मनाला पटत नाही. अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेऊ नये. कोकणामध्ये जर सरकारने मासे बंदी केली तर कसे होईल? किंवा एखाद्या ठिकाणी वऱ्हाडी जेवण बंद केले तर कसे होईल? त्या त्या भागातील संस्कृतीप्रमाणे असणाऱ्या खाद्यावर बंदी घालणं योग्य नाही.
कोयना परिसरातील लोकांना वेठीस धरणार नाही
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, मुंबईकरांसाठी पाणी आणण्यासाठी कोयना परिसरातील लोकांना सरकार वेठीस धरणार नाही. सरकार चर्चा करून समन्वय साधून हा निर्णय घेईल. विकासासाठी सर्वांनी एकत्रित येत काम केले पाहिजे; तिथे सत्ताधारी आणि विरोधक असे काही नसते, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे.
महामार्गासाठी शेतकऱ्यांवर बळजबरी नाही
संजय शिरसाट म्हणाले की, या महामार्गासाठी वारंवार बैठका झाल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. काही ठिकाणी रस्ता वळवण्याचा प्रयत्न केला आहे, तर काही ठिकाणी वाढीव मोबदला देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. तो एक चांगला रस्ता व्हावा, त्याला शेतकऱ्यांनी विरोध करू नये, ही भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे सरकार कोणावरही बळजबरीने काही लादत नाही. शक्य झाले तर मुख्यमंत्री यावर पुन्हा चर्चा करतील. उत्तर प्रदेश निवडणूक लढवायची की नाही, याबद्दल अजून आमच्या पक्षाचा काही निर्णय झालेला नाही. याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे मित्रपक्षांना फटका बसू नये ही आमची भूमिका आहे; पण अंतिम निर्णय एकनाथ शिंदे सर्व नेत्यांना सोबत घेऊन घेतील.
तथ्य नसते तर मानहानी दावा खारीज झाला असता
संजय शिरसाट म्हणाले की, निदा खान प्रकरण असो की माझ्या मानहानीचे प्रकरण असो, तुम्ही चुका केल्या असतील तर तुम्हाला कायदेशीर गोष्टींना सामोरे जावे लागेल. निदा खान प्रकरणी इम्तियाज जलील यांना सहआरोपी केले आहे. माझ्या मानहानी खटल्यातसुद्धा द्वितीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी जलील यांच्याविरुद्ध ‘इश्यू प्रोसेस’चे आदेश जारी केले आहेत. तथ्य नसते तर तो दावा खारीज झाला असता; त्यावर आता कोर्ट योग्य निर्णय देईल.
हे ही वृत्त वाचा पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, पण पक्षात दोन मतप्रवाह असू शकतात:सत्तेत जाण्याची घाई झाली असली तरी राजकीय वारसदारांनी विचारांचे भान ठेवावे- संजय राऊत

शरद पवार यांचे संपूर्ण राजकारण धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात आणि काम करण्यात गेले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर जिवंत ठेवण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. त्यांचे जे राजकीय वारसदार आहेत, त्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, आम्हीही ठेवतो. सत्तेत जाण्याची घाई जर काही लोकांना झाली असेल आणि त्यातून हा विषय गुंडाळला जात असेल, तर हे काही योग्य नाही. शरद पवार हे एनडीएसोबत जाण्याची काही भूमिका घेतील असे मला वाटत नाही. पण प्रत्येक पक्षात दोन मतप्रवाह असतात, तसे त्यांच्या पक्षात असू शकतात, हे मी सांगू शकतो, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर