![]()
राज्याच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या कोयना पाणीवाटप, मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन), रोहित पवारांची स्वपक्षातील कोंडी आणि गोकुळ दूध संघातील वकिलांच्या 80 लाख रुपयांच्या फीच्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत अत्यंत रोखठोक भूमिका मांडली. “रोहित पवारांना लवकरात लवकर मोठे होण्याची आणि अजितदादांची जागा घेण्याची घाई झाली आहे. पक्षाला विश्वासात न घेता ते आक्रमक आंदोलने करत असल्यानेच शरद पवार गटाने त्यांच्या ट्रॅक्टर मोर्चापासून फारकत घेतली आहे,” असा टोला मुश्रीफ यांनी लगावला. तसेच, कोयनेचे वीजनिर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी मुंबईला देण्यास विरोध करण्याची गरज नाही, मात्र वारणेचे पाणी पश्चिम महाराष्ट्र अजिबात नेऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. कोयनेचे समुद्रात जाणारे पाणी मुंबईला नेण्यास हरकत नाही, पण वारणेचे पाणी नेऊ देणार नाही! कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूतोवाचानंतर पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालेल्या वादावर हसन मुश्रीफ यांनी तांत्रिक व राजकीय बाजू स्पष्ट केली. कोयना धरण हे प्रामुख्याने जलविद्युत निर्मितीसाठी बांधण्यात आले असून कृष्णा पाणीवाटप लवादानुसार वीज आणि सिंचनाचा कोटा ठरलेला आहे. वीजनिर्मितीसाठी वापरलेले पाणी घाटाद्वारे कोकणातील चिपळूणच्या नदीत सोडले जाते आणि पुढे ते थेट समुद्राला जाऊन मिळते; पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा वापर होत नाही. त्यामुळे समुद्रात वाहून जाणारे हेच पाणी मुंबईकरांच्या पिण्यासाठी नेण्याचा शासनाचा विचार असेल, तर त्याला विरोध करण्याची गरज नाही. याबाबत सांगली व साताऱ्यातील जनतेने कोणतीही भीती बाळगू नये. मराठवाड्याला केवळ पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्र आपल्या वाट्याचे सिंचनाचे किंवा वारणा नदीचे पाणी अजिबात नेऊ देणार नाही आणि तसा शासनाचा विचारही नाही. केवळ समुद्राला वाहून जाणारे ‘पुराचे पाणी’ मराठवाडा वॉटर ग्रीड आणि जागतिक बँकेच्या प्रकल्पाद्वारे मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी दिले जाणार आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राची सामूहिक जबाबदारी आहे. रोहित पवारांना दादांची जागा घेण्याची घाई नागपूर अधिवेशनावर रोहित पवार काढत असलेल्या ट्रॅक्टर मोर्चापासून शरद पवार गटानेच कार्यकर्त्यांना दूर राहण्याचे आदेश दिल्याच्या मुद्द्यावर मुश्रीफ यांनी भाष्य केले. रोहित पवारांना लवकर मोठे होऊन अजित पवारांची जागा घेण्याची घाई झाली आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेलाही त्यांचा विरोध आहे. पक्षाला विश्वासात न घेता ते परस्पर आंदोलने करत असल्यानेच त्यांच्या पक्षाने या मोर्चापासून फारकत घेतली आहे. 50 टक्के जागावाढीची सुप्रिया सुळेंची भूमिका योग्यच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना ‘भाजपची बी टीम का म्हणत नाही?’ असा सवाल केला होता. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, “माझा मतदारसंघ इतका मोठा आहे की 5 वर्षांत एका गावात पुन्हा जाता येत नाही, असे सुप्रियाताई म्हणाल्या. राज्यातील 48 खासदारांमध्ये 50 टक्के वाढ होऊन जर आणखी 24 खासदार वाढणार असतील (एकूण 72 खासदार), तर त्यांना मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझा स्वतःचा कागल मतदारसंघही आजऱ्याच्या शेवटच्या सोहाळे गावापर्यंत पसरलेला आहे. मतदारसंघ लहान झाल्यास लोकप्रतिनिधींना प्रभावी काम करता येईल, त्यामुळे सुप्रियाताईंची ही भूमिका स्वागतार्ह आहे; द्रमुकनेही (DMK) अशीच भूमिका घेतली आहे.” गोकुळच्या 80 लाखांच्या फीवरून सतेज पाटलांचा आक्रमकपणा का? गोकुळ दूध संघाच्या निवडणूक व कायदेशीर प्रक्रियेत ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना 80 लाख रुपये फी दिल्यावरून आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या ट्वीटला आणि संजय राऊत यांच्या टीकेला मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिले. मुकुल रोहतगी यांना नेमकी किती फी दिली याची माहिती मी उद्या मुंबईला गेल्यावर घेईन. मात्र, सरकारने काढलेल्या अध्यादेशाची बाजू मांडण्यासाठी त्यांना पाचारण केले असेल, तर ती फी सरकारच भरेल; आणि आमच्या वतीने बाजू मांडली असेल, तर आम्ही आतापर्यंत आमच्या खिशातूनच फी दिली आहे. महाधिवक्ता उपलब्ध नसताना वरिष्ठ वकील नेमण्याची कायदेशीर पद्धतच आहे. सतेज पाटलांनी आता गोकुळचा वाद थांबवावा गोकुळच्या उपविधीमुळे (बायलॉज) बहुमत असूनही सतेज पाटील यांना आपला चेअरमन करता आला नाही, हीच खंत त्यांच्या मनात सलत आहे; म्हणूनच ते अजूनही आक्रमक ट्वीट करत आहेत. ‘डेडलॉक’ हा शब्द भुलभुलैया असल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे. आता न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणीत न्यायदेवता जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य करावा; मी नागपूर अधिवेशनात भेटल्यावर स्वतः सतेज पाटलांशी या विषयावर बोलेन. दूध उत्पादकांसाठी 10 हजारांचे अनुदान व कर्ज बंदी उठवली प्रशासक काळातील तोटा भरून काढून गोकुळला पुन्हा भरारी देण्यासाठी नवे चेअरमन व संचालक मंडळाने म्हशीच्या दुधाला 3 रुपये आणि गाईच्या दुधाला 2 रुपये दरवाढ दिली आहे. तसेच, कालच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना 10 हजार रुपये जादा अनुदान देण्याचा आणि दुभत्या गाई खरेदीवरील कर्ज बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे संघाला ताज्या दुधाचा पुरवठा वाढण्यास मदत होईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. ————————————————————– हेही वाचा… शरद पवार अजिबात निवृत्त होणार नाहीत!: त्यांच्या राज्यसभेची अजून 5 वर्षे बाकी आहेत; कोणी निवृत्त व्हायचे हे जनता ठरवेल; सुप्रिया सुळे कडाडल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’मध्ये (NDA) सहभागी व्हावे, यावर पक्षात मंथन सुरू असल्याच्या चर्चेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत निवृत्तीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा पद्धतीने निवृत्तीच्या बातम्या येत असतील, तर ते अत्यंत संतापजनक आहे. शरद पवार निवृत्त होणार नाहीत; त्यांच्या राज्यसभेचा अजून 5 वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे, तेव्हा ते निवृत्त कसे होतील? कोणी निवृत्त व्हायचे, हे जनता ठरवणार,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
रोहित पवारांना अजितदादांची जागा घेण्याची घाई झालीय:सतेज पाटलांना बहुमत असूनही गोकुळचा चेअरमन करता न आल्याची खंत; हसन मुश्रीफ यांचा चौफेर निशाणा