Headlines

पेपरफुटी करणाऱ्यांना आता किमान 10 कोटींचा दंड:10 वर्षांपर्यंत कारावास आणि मालमत्ता जप्ती; उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी




राज्यातील नोकरभरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी व संघटित गैरप्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी 4 सप्टेंबर 2026 रोजी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने सोमवारी (23 नोव्हेंबर 2026) आपला दुसरा सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. या अहवालात पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांना किमान 10 कोटी रुपयांचा दंड, 7 ते 10 वर्षांपर्यंत कारावास आणि मालमत्ता जप्तीसारख्या कठोर शिक्षांची शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो परीक्षार्थींना मोठा दिलासा देत, परीक्षा दिल्यानंतर संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची आणि उत्तरतालिकेवरील हरकत योग्य ठरल्यास तिचेही शुल्क परत देण्याची क्रांतिकारी शिफारस या समितीने केली आहे. पेपरफुटी आणि संघटित गुन्हेगारीवर वज्रप्रहार गेल्या काही महिन्यांत घडलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप होता. हा काळा बाजार पूर्णपणे मोडून काढण्यासाठी समितीने खालील कठोर तरतुदी सुचवल्या आहेत. परीक्षार्थींना मोठा दिलासा; परीक्षा दिल्यावर संपूर्ण शुल्क परत मिळणार! केवळ कठोर शिक्षाच नव्हे, तर विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी समितीने अनेक विद्यार्थीभिमुख शिफारशी केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांवर केंद्रांची जबाबदारी आणि सायबर सुरक्षा कक्ष संपूर्ण भरती प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अभेद्य आणि पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. विविध शासकीय विभागांतील रिक्त पदांची माहिती वेळेत मिळावी यासाठी ‘Integrated Requisition Portal’ विकसित केले जाईल. सर्व विभागांनी दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवणे बंधनकारक राहील. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ‘व्हेन्यू बँक’ प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करून सुरक्षित परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (Venue Bank) तयार केली जाईल. परीक्षा केंद्रांची निवड आणि व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. त्रिस्तरीय कमांड सेंटर आणि सायबर सुरक्षा कक्ष सर्व परीक्षांवर रिअल-टाईम देखरेख ठेवण्यासाठी ‘त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर’ उभारण्याची, तसेच ऑनलाइन व तांत्रिक हॅकिंग रोखण्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती प्रक्रियेत आमूलाग्र आणि ऐतिहासिक बदल घडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. —————————————- हेही वाचा… शरद पवार कधीही थांबणार नाहीत, त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे अयोग्य: मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य, कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याच्या वादावरही केला खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येत्या 12 डिसेंबर रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त राजकारणातून निवृत्ती जाहीर करणार असल्याच्या चर्चांना राज्यात मोठे उधाण आले आहे. या चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर) नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार साहेबांना उत्तम आरोग्य लाभावे, हीच आमची सर्वांची सदिच्छा आहे. पवार साहेब आजही अत्यंत सक्रिय असून मी त्यांना खूप जवळून पाहिले आहे. ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि समाजोपयोगी कामांमध्ये रुची घेत असतात; त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही. ते आपल्या आयुष्यात कधीही थांबणार नाहीत आणि काही ना काही सकारात्मक काम करतच राहतील, असा मला विश्वास आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याचा वाद, आगामी अधिवेशनातील परीक्षा सुधारणा विधेयक आणि ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनच्या नामांतराबाबत महत्त्वाची माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *