Headlines

शिरजगाव कसबा येथे कार्तिक त्रिजठा भव्य रथोत्सव:राम लक्ष्मण बालकांच्या दहीहंडी फोडून केले महाप्रसादाचे आयोजन, भाविकांची उपस्थिती



शिरजगाव कसबा येथील कार्तिक स्वामी मंदिर परिसरातील आठवडी बाजार परिसरात कार्तिक उत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा सप्ताह उत्साहात सुरू असून हा सोहळा २५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. कथावाचक श्री नरेश आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून श्रीमद् भागवत क

.

भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तयारी सुरू आहे. तसेच महावितरण वीज कार्यालयाचे सहायक अभियंता हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कर्मचाऱ्यांनी रथोत्सवाच्या मुख्य मार्गावरील विद्युत पुरवठ्याबाबत योग्य खबरदारी घेतली आहे. वीजप्रवाहाच्या तारा रथोत्सवाला अडथळा ठरू नयेत याची दक्षता घेतली आहे. मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या रोहित यंत्राच्या परिसराला तारांचे कुंपण घालण्यात आले आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता महावितरण कार्यालयाने खबरदारी घेतली आहे. शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमन सिरसट यांनी गावातील सर्व कार्तिक उत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशन येथे शांतता मीटिंग आयोजित केली.

कार्यक्रमानिमित्त विशेष ग्रामस्वच्छता जिल्ह्यातील सर्वात मोठा कार्तिकमास समाप्ती त्रिजठा रथोत्सव या गावी होत असल्याने जिल्हा व स्थानिक प्रशासन या रथोत्सव कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी नियोजन करीत आहे. ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते व ग्रामपंचायत कार्यालय प्रशासक अमित मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कार्तिक त्रिजठा रथोत्सव कार्यक्रमानिमित्त विशेष ग्रामस्वच्छता सुरू केली आहे. रथोत्सवाच्या मुख्य मार्गावर देखभाल-दुरुस्ती केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *