![]()
देशभरातील संस्थांना रोजगार आणि उपजीविकेच्या क्षेत्रातील आपली कामगिरी 2 ते 3 पटीने विस्तारता यावी, यासाठी वाधवानी फाऊंडेशनने वाधवानी ग्रँट्स अंतर्गत स्वारस्य अभिव्यक्ती म्हणजेच ईओआय सादर करण्याचे आवाहन केले आहे. निकालांवर आधारित बहु-वर्षीय अनुदानाच्या
.
ठरावीक उपक्रम किंवा प्रकल्पांना निधी देणाऱ्या पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी भूमिका घेत, वाधवानी ग्रँट्स स्वतंत्रपणे पडताळलेल्या प्रत्यक्ष परिणामांवर निधी देते. यामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे, नवीन रोजगार तयार करणे आणि उपजीविकेत सुधारणा होणे या बाबींचा समावेश आहे.
3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी…
प्रत्येक संस्थेची यशस्वी कामगिरी, वाढीची शक्यता आणि निधीची गरज यानुसार अनुदानाची रक्कम निश्चित केली जाते, ती आधीच ठरलेली नसते. 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत राहणारे हे प्रारूप मूळ परिणामांच्या आधारावर निधी देते आणि मूळ पातळीपलीकडील वाढीसाठी जास्तीची मदत देते. या निधीमुळे आधीपासून मिळणाऱ्या निधीला जोड मिळते, तसेच त्यात समभागातील घट किंवा पैसे परत करण्याची अट नसते. याशिवाय, निवड झालेल्या संस्थांना त्यांचे कार्य अधिक वेगवान आणि विस्तारित करता यावे म्हणून वाधवानी फाऊंडेशनच्या एआय आधारित जिनीएआय या मंचाचा मोफत वापर करता येईल.
जागतिक संस्थेच्या विस्तृत जाळ्याचा फायदाही…
सोबतच, एआय-फर्स्ट तंत्रज्ञान मंच, यशस्वी ठरलेले कार्यक्रम, संबंधित विषयातील कौशल्य तसेच उद्योजकता, कौशल्य विकास आणि नवप्रवर्तनाशी जोडलेल्या जागतिक संस्थेच्या विस्तृत जाळ्याचा फायदाही या संस्थांना मिळेल. 20 वर्षांहून अधिक काळ उभारलेली आणि विकसित केलेली ही साधने आधुनिक एआय क्षमता, व्यावहारिक साधने आणि अंमलबजावणीचे कौशल्य यांचा मेळ घालतात, ज्यामुळे सेवा वितरण अधिक भक्कम होते, कार्यक्षमता वाढते आणि व्यापक पातळीवर परिणाम साधण्यास गती मिळते.
संस्थांना साथ देण्याचा प्रयत्न….
वाधवानी फाऊंडेशनचे CEO & Board member डॉ. अजय केला यांनी सांगितले की, भारतात रोजगार निर्माण करणाऱ्या आणि उपजीविकेचा दर्जा उंचावणाऱ्या संस्थांची कमतरता नाही, परंतु मोठ्या स्तरावर काम करण्यासाठी अनेक संस्थांकडे भांडवल आणि एआय-फर्स्ट तंत्रज्ञानाचा अभाव आहे. आर्थिक संधींना बळ देण्याच्या 25 वर्षांच्या प्रवासात, आधी यशस्वी झालेल्या कामांच्या पुढील टप्प्यात अनेक पटींनी वाढ करण्यावर भर द्यायला हवा, असे वाटते. वाधवानी ग्रँट्सद्वारे प्रत्यक्ष परिणामांशी जोडलेल्या प्रोत्साहनपर निधीच्या माध्यमातून सिद्ध परिणाम देणाऱ्या संस्थांना साथ देण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून अधिक रोजगार निर्माण होतील, उत्पन्न वाढेल आणि भारताच्या विकासाच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देता येईल.
कोणत्या संस्था अर्ज करू शकतील?
- रोजगार पूर्तता: नोकरी शोधणाऱ्यांना प्रत्यक्ष नोकरी मिळवून देणारे कौशल्य विकास आणि रोजगार जोडणीचे काम करणाऱ्या संस्था.
- रोजगार निर्मिती: उद्योजक, स्टार्टअप्स आणि एमएसएमई यांना व्यवसाय वाढवण्यास व नवे रोजगार निर्माण करण्यास मदत करणाऱ्या संस्था.
- उपजीविकेत वाढ: स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबांच्या उत्पन्नात मोजता येईल अशी वाढ घडवून आणणाऱ्या संस्था.
ज्या संस्थांकडून आधीच मोठ्या प्रमाणावर रोजगार किंवा उपजीविकेचे परिणाम साध्य होत आहेत, त्यांना अर्ज करण्यास विशेष प्रोत्साहन दिले जाईल. अर्ज करणाऱ्या संस्थांकडे कार्यरत वितरण प्रणाली, परिणामांचे खात्रीशीर पुरावे आणि प्रभावाचा मोठा विस्तार करण्याची संस्थात्मक क्षमता असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया सुरू
- पात्र संस्थांनी आपले कार्य, सिद्ध झालेले परिणाम आणि विस्तार करण्याची क्षमता स्पष्ट करणारी स्वारस्य अभिव्यक्ती सादर करावी. अर्जांची तपासणी नियमितपणे सुरू राहील आणि पात्र ठरलेल्या संस्था पुढील सखोल मूल्यमापनासाठी निवडल्या जातील.
- अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: https://wadhwanifoundation.org/initiatives/grants/
- चौकशीसाठी ईमेल: marketing@wadhwanifoundation.org