Headlines

Navnath Ban Slams Thackeray Group Over Pune Firing & Devendra Fadnavis


पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गोळीबार-कोयता हल्ला आणि मुंबईतील माहीम येथील गोळीबाराच्या घटनेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुरू केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी (26

.

पुण्यातील आरोपींना 12 तासांत अटक; मविआ काळातील गुन्ह्यांची आकडेवारी अंधारेंनी पाहावी!

पुण्यातील घटनेचा संबंध खंडणीशी नसून तो वैयक्तिक वैमनस्यातून घडलेला प्रकार असल्याचे स्पष्ट करत नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या 2020 व 2021 मधील गुन्हेगारीचा पाढा वाचला. पुण्यातील घटना ही 2 भावांमधील शेतीच्या वादातून घडली असूनही मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपींना अटक केली. या प्रकरणात पोलीस यंत्रणेकडून काही त्रुटी (लूपहोल्स) राहिल्या असतील, तर संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल. तसेच, मुंबईतील माहीम येथे ज्वेलर्सवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली वेगाने सुरू आहे.

मविआ काळातील गाजलेली प्रकरणे

संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी 2020 ते 2022 मधील कारभार आठवावा. पालघर साधू हत्याकांड (16 एप्रिल 2020), दिशा सालियन मृत्यू प्रकरण (8 जून 2020), अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण (14 जून 2020), अँटिलिया स्फोटक प्रकरण (15 फेब्रुवारी 2021), मनसुख हिरेन हत्या (मार्च 2021), साकीनाका येथे 34 वर्षीय महिलेवरील बलात्कार व हत्या (10 सप्टेंबर 2021), पुण्यातील व्यावसायिक पुनवणे अपहरण व हत्या (फेब्रुवारी 2021), परमबीर सिंह यांचे 100 कोटी वसुलीचे आरोप आणि अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांड (21 जून 2022) हे सर्व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घडले. तेव्हा उद्धव ठाकरे ‘सचिन वाझे काय लादेन आहे का?’ असे म्हणत समर्थन करत होते.

2020 आणि 2021 मधील गुन्ह्यांची तुलनात्मक आकडेवारी

सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात आकडेवारी वाचून दाखवली, पण त्यांनी आपल्या सरकारच्या काळातील आकडेही पाहावेत:

  • हत्या: 2020 मध्ये 148, तर 2021 मध्ये 192 हत्या झाल्या.
  • दरोडे: 2020 मध्ये 614, तर 2021 मध्ये 750 दरोडे पडले.
  • खंडणी: 2020 मध्ये 204, तर 2021 मध्ये 280 खंडणीचे गुन्हे नोंदवले गेले.
  • बलात्कार: 2020 मध्ये 766, तर 2021 मध्ये 888 घटना घडल्या.
  • विनयभंग: 2020 मध्ये 1943, तर 2021 मध्ये 2076 गुन्हे घडले.
  • एकूण नोंदवलेले गुन्हे: 2020 मध्ये सुमारे 51000, तर 2021 मध्ये 566000 (किंवा 66000) गुन्हे नोंदवले गेले होते.

पुण्याचा व्हिडिओ अर्धा सेकंदही पाहू न शकणाऱ्या आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनचे व्हिडिओ का डिलीट केले?

पुण्यातील हल्ल्याचा व्हिडिओ आपण अर्धा सेकंदही पाहू शकलो नाही, असे विधान करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना नवनाथ बन यांनी थेट लक्ष्य केले. पुण्याचा व्हिडिओ तुम्हाला अर्धा सेकंदही पाहवला नाही; मग दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे व्हिडिओ तुम्ही किती सेकंद पाहिले होते? दिशा सालियन प्रकरणाचे व्हिडिओ अर्ध्या सेकंदात का डिलीट करायला लावले आणि या प्रकरणात कोणाला पाठीशी घातले, याचे उत्तर आदित्य ठाकरेंनी आधी माध्यमांसमोर येऊन द्यावे आणि मगच देवेंद्र फडणवीसांवर टीका करावी.

सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद

सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुण्याच्या सुरक्षिततेबाबत साद घातल्याबद्दल बन यांनी त्यांचे आभार मानले, तर संजय राऊत यांच्या चिडचिडीची खिल्ली उडवली. एकेकाळी ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ म्हणणाऱ्या आणि राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आता देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकत्व स्वीकारावे असे म्हटले आहे. त्यांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सध्या पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार अतिशय चांगले काम करत असून वैयक्तिक वादातील एका घटनेवरून त्यांना दोष देणे चुकीचे आहे.

राऊतांनी कंपाऊंडर नव्हे, तर चांगला डॉक्टर ठेवावा

सुप्रिया सुळे यांच्याकडे 10 आमदार असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्यास ती चांगलीच गोष्ट आहे; अर्थात येणारा काळ ते ठरवेल. उद्धव ठाकरेही 25 वर्षे मुख्यमंत्री राहणार होते, याची आठवण राऊतांनी ठेवावी. आज पत्रकारांनी राष्ट्रवादी आणि सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊत पत्रकारांवर भडकले. या बातम्या ऐकून राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा बीपी शूट झाला आहे. त्यांनी थंड किंवा कोमट पाणी प्यावे, आजूबाजूला 4 चांगले डॉक्टर व औषधे ठेवावीत आणि कंपाऊंडरकडून नव्हे तर डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत, असा टोला बन यांनी लगावला.

कर्नाटकात 4 परीक्षांचे पेपर फुटले, तिथे अभिजीत दिपके व गँग कधी आंदोलन करणार?

नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नवनाथ बन यांनी कर्नाटकातील पेपरफुटीवरून आव्हान दिले. नीट (NEET) पेपरफुटीनंतर दिल्लीत आणि एमपीएससी (MPSC) पेपरफुटीनंतर महाराष्ट्रात आंदोलन करणारे अभिजीत दिपके आज नागपुरात आंदोलन करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि राहुल गांधींचे सरकार असलेल्या कर्नाटकात 1-2 नव्हे तर तब्बल 4 परीक्षांचे (KPSC अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, कृषी अधिकारी आणि व्हिडिओ परीक्षा) पेपर फुटले आहेत. नागपूरचे आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दिपके, सौरभ दास आणि त्यांची गँग कर्नाटकात जाऊन राहुल गांधी आणि डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात कधी आंदोलन करणार याचा मुहूर्त जाहीर करावा; अन्यथा ते काँग्रेसची ‘बी-टीम’ असल्याचे सिद्ध होईल.

दरम्यान, काल एसआयटीच्या (SIT) पथकाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली आहे; ती ऑडिओ क्लिप खरी आहे की बनावट (फॅब्रिकेटेड), हे एसआयटीच्या तपासातून लवकरच महाराष्ट्रासमोर येईल. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्याबाबत केलेल्या विधानावर आपण पूर्ण भाषण ऐकूनच प्रतिक्रिया देऊ, असेही नवनाथ बन यांनी स्पष्ट केले.

——————————————————–

हेही वाचा…

पुण्यनगरीची ‘कोयतानगरी’ झाली: राज्याला आता पूर्णवेळ गृहमंत्री द्या आणि पुणे आयुक्तांना बदला; सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

“कधीकाळी विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि पेन्शनरांचे शांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज ‘कोयतानगरी’ आणि ‘क्राईम सिटी’ अशी झाली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारून कायद्याचे राज्य सुरू केले; मात्र नेमके संविधान दिनीच आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या 18 व्या स्मृतिदिनी मला महाराष्ट्रातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवावे लागत आहे,” अशा तीव्र शब्दांत शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर 2026) मुंबईतील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलीस आयुक्तांवर हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी

विद्येचे माहेरघर आता गुंडांचे माहेरघर झाले: राज्यात कायद्याचे राज्य राहिले नाही, गृहमंत्रालय अपयशी, भाजपकडून गुंडांना आश्रय, मुंबईतील व्यापारी दहशतीखाली- संजय राऊत

पुणे हे विद्येचे माहेरघर होते, ते आता गुंडांचे माहेरघर झाले आहे. पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत? नागपुरातसुद्धा असेच वातावरण आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, म्हणजेच गृहमंत्रालय अपयशी ठरले आहे असा त्याचा अर्थ होतो. ज्यांच्याकडे हे खाते आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.