Headlines

पुण्याचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्र्यांना देऊ नका, अन्यथा वाटोळे होईल: रोहित पवारांची टीका, म्हणाले- नागपूरवर शेतकरी-शेतमजुरांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणारच


“सुप्रियाताईंनी सहज बोलता-बोलता म्हटले की सुनेत्रा काकींना अजितदादांसारखे काम जमत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पालकत्व घ्यावे; मात्र एक पुणेकर नागरिक म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की, पुण्याचे पालकमंत्रिपद कृपा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

.

मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सीईटी (CET) परीक्षेतील 25 ते 30 लाख रुपयांच्या पर्सेन्टाईल घोटाळ्याचे अतिरिक्त पुरावे आयुक्तांना दिल्याचे सांगितले. तसेच, शेवगाव येथून 4 डिसेंबर रोजी निघणारा आणि 9 डिसेंबर रोजी नागपूरला धडकणारा ट्रॅक्टर मोर्चा हा कोणत्याही एका पक्षाचा नसून शेतकरी व शेतमजुरांचा अराजकीय मोर्चा असेल, असे स्पष्ट करत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डिहायड्रेशन व इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली.

सीईटी परीक्षेत 25 ते 30 लाख देऊन पर्सेन्टाईल वाढवले जातात

मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सीईटी परीक्षा घोटाळ्याबाबतचे नवीन पुरावे सादर केल्यानंतर रोहित पवार यांनी तपासातील दिरंगाईवर बोट ठेवले. एमपीएससी (MPSC) घोटाळ्याचा तपास एसआयटीने (SIT) योग्य प्रकारे करून न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. मात्र, सीईटी (CET) घोटाळ्याच्या तपासात पिसाळ नावाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर कोणाचा तरी दबाव असल्याचे जाणवते. 12 वी नंतर अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग) ते कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत 25 ते 30 लाख रुपये देऊन पर्सेन्टाईल वाढवले जातात आणि त्याचे धागेदोरे उत्तर प्रदेश व दिल्लीपर्यंत जातात.

पुढील 8 दिवसांत वस्तुस्थिती समोर येणार

आपण आज सीईटीचे शिक्षक शिंगारे सर व इतरांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अतिरिक्त पुरावे दिले आहेत. आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून पुढील 8 दिवसांत वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याचे आश्वासन दिले आहे.

पुणे पोलीस आयुक्त बदलल्यास परिस्थिती सुधारेल!

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील भरदिवसा झालेल्या गोळीबार व कोयता हल्ल्याच्या घटनेवरून रोहित पवार यांनी गृहखाते आणि पुणे पोलीस आयुक्तांवर जोरदार निशाणा साधला. अजितदादांचा प्रशासनावर मोठा वचक आणि दरारा होता; त्यांच्या जाण्यानंतर त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. सुनेत्रा काकींची ही सुरुवात असल्याने त्यांना पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करणे अद्याप जमत नसावे, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी व आमदारांनी त्यांना सहकार्य करून ताकद दिली पाहिजे.

पुणे आयुक्तांवर पक्षपातीपणाचा आरोप

मुख्य अडचण अशी आहे की पुणे पोलीस आयुक्त हे पालकमंत्री सुनेत्रा पवार किंवा इतर कोणाचेच ऐकत नाहीत; ते केवळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच ऐकतात. देवेंद्र फडणवीस हे आमदार-खासदार व पक्ष फोडण्यात आणि निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत; तसेच अजितदादांच्या पक्षाकडील अर्थखातेही भाजपने स्वतःकडे घेतल्याने फडणवीसांना गृहखात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी गृहखाते भाजपच्या एखाद्या कार्यक्षम आमदाराकडे सोपवावे आणि पुणे पोलीस आयुक्तांची तात्काळ बदली करावी. तसेच, अजितदादांच्या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवण्यासाठी मात्र सरकार अशी तत्परता दाखवत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

4 ते 9 डिसेंबर दरम्यान नागपूरवर ट्रॅक्टर मोर्चा निघणारच!”

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीची खिल्ली उडवत रोहित पवार यांनी आगामी ट्रॅक्टर मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. काल बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केवळ 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू म्हणजेच एका कुटुंबाला महिन्याला 250 रुपयांचे धान्य देण्याची घोषणा झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून नमो सन्मान योजनेचे दर 3 महिन्यांनी मिळणारे 2000 रुपये आणि रोजगार हमी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना 2 पत्रे लिहूनही सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

सर्वपक्षीय नेते सहभागी होणार

त्यामुळे 4 डिसेंबर रोजी शेवगाव येथून निघणारा आणि 9 डिसेंबर रोजी नागपूरला पोहोचणारा ट्रॅक्टर मोर्चा हा रोहित पवार किंवा एका पक्षाचा नसून शेतकरी, शेतमजूर, बचत गटाच्या महिला, विद्यार्थी आणि मच्छीमारांचा अराजकीय मोर्चा आहे. या मोर्चाला आम्ही पाठिंबा दिला असून काँग्रेसचे नाना पटोले, अतुल लोंढे, तसेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार देशमुख यांच्यासह सर्व समविचारी नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट

बैठका आणि दुष्काळाच्या कामात व्यस्त राहिल्याने वेळेवर जेवण न झाल्यामुळे शरद पवार यांना डिहायड्रेशन आणि इन्फेक्शनचा त्रास झाला होता. सुप्रिया सुळे स्वतः त्यांना रुग्णालयात सोडून आल्या असून डॉक्टरांशी चर्चा झाली आहे; पवार साहेबांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. मात्र, इन्फेक्शनचा धोका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी काही दिवस त्यांना भेटण्याचे टाळावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.

डिलिमिटेशनचा मसुदा आल्याशिवाय पाठिंबा नाही

डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाचा मसुदा अद्याप संसदेत आलेला नाही. या समितीचे अध्यक्ष कोण असतील आणि मतदारसंघांची रचना कशी होणार याची स्पष्टता आल्याशिवाय तसेच भाजप याचा गैरवापर करणार नाही याची खात्री पटल्याशिवाय काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा आमचा पक्ष त्यावर कोणताही निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

————————————————————

हेही वाचा…

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल: सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीची अपडेट- बाबांची तब्येत ठीक आहे, प्रफुल्ल पटेलही भेटीसाठी दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. शरद पवार यांची प्रकृती सध्या उत्तम असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक अर्धवट सोडून तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेदेखील शरद पवार यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे पवार यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.