Headlines

शिंदेंनी पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होऊन आषाढीची पूजा पंढरपुरात करावी: खासदार ज्योती वाघमारेंचे वक्तव्य; म्हणाल्या- लाडक्या बहिणींचा हाच संदेश


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर 2026) संविधान दिनाचे औचित्य साधून किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले. पर्यावरण विभागाच्या वतीने रायगडावर आयोजि

.

गडकिल्ल्यांचे पावित्र्य आणि मांगल्य राखत ते प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, एकनाथ शिंदे यांनी पुढच्या वर्षी पुन्हा मुख्यमंत्री होऊन आषाढी एकादशीची पूजा पंढरपुरात करावी, असे विधान करत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

लाडक्या बहिणींचा हाच संदेश; पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होऊन आषाढीची पूजा पंढरपुरात करावी!

किल्ले रायगडावर पत्रकारांशी बोलताना खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असून राज्यातील सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. मी राज्यभरात फिरत असताना मला लाडक्या बहिणींनी हाच संदेश दिला आहे की, एकनाथ शिंदे यांनी पुढच्या वर्षी पुन्हा मुख्यमंत्री होऊन पंढरपुरात आषाढी एकादशीची महापूजा करावी.

18 पगड जातींना सन्मानाने उभे करणारे नेतृत्व

राजकारणात अनेकदा गरिबी आणि जात अडचणीची ठरते; मात्र एकनाथ शिंदे यांची ताकद समाजातील 18 पगड जातींना सन्मानाने उभे करत आहे, अशा शब्दांत वाघमारे यांनी शिंदेंच्या कार्यपद्धतीचा गौरव केला.

‘भीमाच्या लेकी’ला खासदार एकनाथ शिंदेंनी केले

संविधान दिनाचे औचित्य साधत ज्योती वाघमारे यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि संविधानाची ताकद अधोरेखित केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जे प्रत्यक्षात आणले, त्याला घटनात्मक रूप देण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य हे केवळ भोसले कुटुंबाचे नसून संपूर्ण रयतेचे होते; मात्र काँग्रेसने आज हा देश केवळ गांधी कुटुंबाचा करून ठेवला आहे. जे लोक आज संविधान धोक्यात असल्याची ओरड करतात, त्यांना संविधानावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

वर्षा बंगल्यावर पंचशीलाचे सूर घुमले

संविधानाच्या ताकदीमुळेच आज एक चहावाला देशाचा पंतप्रधान आणि एक रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पंचशीलाचे सूर घुमले. राजकारणात स्वतःच्या लेकीला खासदार बनवणारे अनेक नेते आहेत; मात्र या ‘भीमाच्या लेकी’ला खास बनवून खासदार बनवण्याचे ऐतिहासिक काम एकनाथ शिंदे यांनीच केले आहे, असे भावूक उद्गारही वाघमारे यांनी काढले.

काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ले झाले तेव्हा सर्वात आधी एकनाथ शिंदेच मदतीला धावले – पालकमंत्री भरत गोगावले

यावेळी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील नेतृत्वाची आठवण करून देत विरोधकांवर टीका केली. काश्मीरमध्ये हिंदूंवर दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा मदतीसाठी सर्वात 1 ल्यांदा एकनाथ शिंदेच धावून गेले होते आणि त्यानंतर गिरीश महाजन मदतीला पोहोचले. कोणत्याही अडीअडचणीच्या काळात सर्वात आधी धावून जाणारे नेते म्हणजे एकनाथ शिंदे आहेत.

हा रायगडचा मावळा सदैव शिंदेंच्या पाठीशी

एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली आहे. एकीकडे आमचे सरकार राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करत असताना, विरोधकांकडून मात्र राज्यात नवे उद्योग येऊ नयेत यासाठी अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा टोला गोगावले यांनी लगावला. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी हा रायगडचा मावळा कायम खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

———————————————-

हेही वाचा…

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ल्यातील 6 आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी: आम्ही कात्रजचे राजे, नादी लागू नका म्हणत केले होते पलायन

पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी 12.45 ते 1.15 वाजण्याच्या सुमारास जामिनावर सुटलेला आरोपी मंदार मारुती किवळे (वय 35, रा. नवीन वसाहत, कात्रज) याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करून दोन्ही हातांचे पंजे छाटल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या. या सर्व आरोपींना गुरुवारी (26 नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.