Headlines

रोहित पवारांनी कुटुंबातील व्यक्तींवर बोलणे टाळावे: प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप सुरू; त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखवण्याची वेळ आली- सुनील शेळके


मागील अनेक दिवसांपासून रोहित पवार सातत्याने प्रसिद्धी मिळावी, यासाठी अनेक नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहेत. त्यासाठी ते कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, तर कधी देशातील काही नेत्यांवर सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रे

.

सुनील शेळके पुढे म्हणाले की, रोहित पवार यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर बोलणे टाळले पाहिजे. पवार कुटुंबातील इतर लोकांवर टीका करत ‘मी खूप चांगला आहे,’ हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी करू नये. त्यांनी कर्जत-जामखेडमध्ये जाऊन मतदारांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. तुम्ही किती कर्तबगार आहात, हे मतदारसंघातील जनताच बोलत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

रोहित पवारांना त्यांच्या पक्षात काय किंमत?

शेळके म्हणाले की, सुनेत्रा पवार एक महिला असतानाही त्यांच्यावर जी जबाबदारी अचानक पडली, ती त्या अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. महायुती सरकारमध्ये काय करायचे, यामध्ये रोहित पवारांनी काही बोलण्याची गरज नाही. कोणाला काय पद द्यायचे आणि कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे राहणार, हे महायुती म्हणून आम्ही ठरवू; रोहित पवारांनी त्याकडे लक्ष देऊ नये. त्यांनी स्वतःला विचारले पाहिजे की, ‘शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आपल्याला किती किंमत राहिली आहे? कोणी आपल्याला विचारते का?’ याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे आमदार शेळके यांनी सुनावले.

सुनेत्रा पवार चांगले काम करतात

सुनील शेळके पुढे म्हणाले की, सुनेत्रा पवार या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळत आहेत. त्या सकाळी ७ वाजल्यापासून काम करत आहेत. अजितदादांचा वावर असलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्या काम करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वृत्त वाचा

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी:लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव; विधेयकाला पाठिंबा देणारे इतिहासात ‘गद्दार’ ठरतील- संजय राऊत

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना देशाची जनता इतिहासात ‘गद्दार’ म्हणून लक्षात ठेवेल, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. देशाचे विभाजन होत असताना, लोकसभेचे महत्त्व कमी केले जात असताना आणि जनतेकडून सत्ता हिरावून घेतली जात असताना जे खासदार सरकारच्या बाजूने मतदान करतील, त्यांना जनता गद्दारच मानेल, असे ते म्हणाले. हे विधेयक राष्ट्रविरोधी असून यामुळे लोकसभेचे महत्त्व कमी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.