Headlines

मिशन ॲडमिशन: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 50 केंद्रांवर नवोदय प्रवेश परीक्षा; 28 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून पेपर



पीएम श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय (कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी वर्ग 6 वी प्रवेश चाचणी परीक्षा (JNVST 2027) शनिवार, दिनांक 28 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर

.

परीक्षेची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 1.30 अशी निश्चित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी सकाळी 11.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. सकाळी 11.30 नंतर केंद्रावर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा पारदर्शक होणार

परीक्षा पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा शिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, परीक्षा केंद्राध्यक्ष, केंद्रस्तरीय निरीक्षक तसेच कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व सहकारी यांच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

केंद्राध्यक्षांना दक्षतेच्या सूचना

या नियोजनाचा भाग म्हणून सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 26 नोव्हेंबर 2026 रोजी मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली. या बैठकीत कन्नड जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षेसंदर्भातील आवश्यक सूचना दिल्या व उपस्थित शंकांचे निरसन केले. तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पूर्वानुभवांच्या आधारे परीक्षा केंद्राध्यक्षांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.

वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन

ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही परीक्षा घेतली जात असून, सर्व परीक्षार्थींनी वेळेवर उपस्थित राहावे आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व स्तरांतून सहकार्य करावे, असे आवाहन कन्नड येथील पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांतर्फे करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *