Headlines

ग्राहक सेवा म्हणून अभय योजना राबवा!: महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांचे कर्मचाऱ्यांना निर्देश



महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर मंडलातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना मुख्य अभियंता दीपक कुमठेकर. सोबत अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे.

कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजनेत व्याज व विलंब आकारावर १०० टक्के माफी देण्यात येत आहे. ही योजना केवळ थकबाकी वसुलीची मोहीम न मानता ग्राहकांना पुन्हा वीजप

.

छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील सुमारे ५०० अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्रांशी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्राहकांना गतिमान सेवा आणि सुरळीत वीजपुरवठा देण्यास सर्वोच्च प्राधान्य देतानाच वापरलेल्या विजेच्या बिलांची नियमित वसुली करण्याचे आवाहन केले.

काय आहे योजना?

शहर मंडलात बिलांचा भरणा न केल्यामुळे तब्बल ५८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी किंवा तात्पुरता खंडित झाला आहे. या ग्राहकांना थकबाकीतून दिलासा देण्यासाठी ६ नोव्हेंबरपासून अभय योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक पात्र ग्राहकापर्यंत प्रत्यक्ष पोहोचा, त्यांना योजनेतील सवलतींची माहिती द्या आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करा, असे कुमठेकर यांनी सांगितले.

सवलतीचा भरघोस लाभ

शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी योजनेतील आर्थिक सवलतींची माहिती दिली. ते म्हणाले की, योजनेस पात्र असलेल्या ५८ हजार ग्राहकांपैकी ३२ हजार ग्राहकांना ३० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळणार आहे. या ग्राहकांकडे एकूण १९५ कोटी रुपयांची थकबाकी असून, त्यापैकी १११ कोटी रुपये भरल्यास तब्बल ८३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. तसेच, ८ हजार ८०० ग्राहकांनी त्यांच्याकडील १४.३८ कोटी रुपयांची मूळ थकबाकी भरल्यास त्यांना २०.९१ कोटी रुपयांची सवलत मिळू शकते. विशेष म्हणजे, या योजनेत वीजजोडणी पुन्हा जोडण्यासाठी आकारले जाणारे शुल्कही माफ करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र ग्राहकांपर्यंत योजनेचे फायदे पोहोचवून त्यांना थकबाकीमुक्त होण्यासाठी मदत करा आणि शहर मंडलाच्या महसूलवाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले (शहर विभाग-१), महेंद्र देशमुख (शहर विभाग-२), व्यवस्थापक नितीन पाडसवान (वित्त व लेखा), व्यवस्थापक संजय खाडे (मानव संसाधन), विधी अधिकारी सुनील पावडे यांच्यासह उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, वित्त व लेखा तसेच मानव संसाधन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि जनमित्र उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *