![]()
चपळगांव प्रशालेने मला चपळ बनविले. माझ्या जडणघडणीत या शाळेचे, शिक्षकांचे व येथील बोर्डिंगचे महत्त्व आहे. जसे कुरनुर धरणामुळे भागाला पानी देऊन सिंचन केले आहे तसे चपळगांव शाळेने या संपूर्ण भागाला ज्ञानाचे पाणी देऊन समृद्ध केले आहे. आम्हाला माणसात या चंप
.
साहित्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांनी शनिवारी आपल्या शिक्षणाची जडणघडण झालेल्या ग्रामीण विद्या विकास विद्यालय,चपळगाव येथे भेट दिली. यावेळी प्रशालेच्या वतीने तसेच चपळगाव व बावकरवाडी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे होते. व्यासपीठावर ग्रामीण विकास विद्यालय संस्थाध्यक्ष रविकांत पाटील, सचिव प्रभाकर हंजगे, संचालक काशिनाथ उटगे, गुलाब बाणेगाव, मनोज इंगुले, प्रा. राजशेखर शिंदे, पत्रकार नारायण चव्हाण, सिद्धू भंडारकवठे, पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ, महादेव वाले, माजी चेअरमन नंदकुमार पाटील, दयानंद फताटे, माजी प्राचार्य ब. रे. मठदेवरू, के. बी. पाटील, अंबणप्पा भंगे, इसहाक पटेल, गौरीशंकर म्हमाणे, राचप्पा सुतार, विजयकुमार नन्ना, प्रकाश गजाकोस, गणेश कोळी, प्राचार्य विश्वनाथ बाणेगाव, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कदम, माजी सरपंच वर्षा भंडारकवठे आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष रविकांत पाटील यांनी लिंबाळे यांचा सत्कार केला. चपळगाव व व बावकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्यासह उपस्थितांनी त्यांचा गौरव केला. प्रास्ताविक रविकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संतोष नरे यांनी केले तर आभार प्राचार्य विश्वनाथ बाणेगाव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे सीईओ नीलकंठेश्वर पाटील यांच्या सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम लिंबाळे यांनी चपळगाव प्रशाला आणि गावाच्या आठवणींना उजाळा दिला. “आज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे, त्यासाठी इथले संस्कार आणि शिक्षण महत्त्वाचे व मोलाचे आहे,” असे त्यांनी सांगितले. आपल्याला शिकवलेल्या सर्व शिक्षकांची त्यांनी आवर्जून नावे घेतली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक ठिकाणी सत्कार झाले. मात्र चपळगाव प्रशालेत झालेला हा सत्कार आयुष्यात कधीही विसरणार नाही.
अनेकांना प्रेरणा : अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे म्हणाले, शरणकुमार लिंबाळे हे गुणवत्तेच्या व ज्ञानाच्या जोरावर पुढे गेलेले आहेत. त्यांच्या साहित्यातून कित्येकांनी प्रेरणा घेतली आहे.
प्रशालेला कधीच विसरणार नाही