Headlines

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही ‘कार्यक्रम’ करण्याचा भाजपचा डाव होता: पवारांच्या पक्षाचे खासदार डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करतील अशी चिन्हे- पृथ्वीराज चव्हाण


मला भाजपच्या काही सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जसा कार्यक्रम केला, तसाच कार्यक्रम आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही करणार आहोत. त्यांनी मला 5-6 जणांचा आकडा सांगितला होता की ते अस्वस्थ आहेत. मात्र, या

.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांचे डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान होईल, अशी चिन्हे आता दिसत आहेत; पण अंतिम निर्णय होईपर्यंत त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. येत्या एक-दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे मला वाटते. त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना आपली भूमिका कळवली असेल, असे वाटते. राष्ट्रवादीचे काही नेते म्हणतात की आमची चर्चा झाली नाही, तर काही म्हणतात की आमचा निर्णय झाला आहे. इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीतही या सगळ्यावर चर्चा झाली असावी.

शरद पवारांचे इंडियातील स्थान पहिल्यासारखेच- राहुल गांधी

या विषयावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, शरद पवारांचे इंडिया आघाडीतील जे आधी स्थान होते, तेच स्थान पुढेही कायम राहील. त्यांनी जरी या विधेयकासाठी मोदी सरकारला पाठिंबा दिला, तरी त्यांचे स्थान पहिल्याप्रमाणेच असेल.

संविधान संपवण्याचा भाजप-संघाचा डाव – पटोले

महिला आरक्षणाचे नाव पुढे करून देशाचे संविधान संपवण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरू असून, त्यांचा हा मनसुबा देशातील जनतेने ओळखला आहे, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, मतदारसंघ पुनर्रचनेबाबत (डिलिमिटेशन) काय निर्णय घ्यायचा हा शरद पवार यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत, राहुल गांधी यांनी या संदर्भात मांडलेल्या सकारात्मक भूमिकेचे देशभरातील लोकांनी स्वागत केले असल्याचे पटोले यांनी नमूद केले.

हे ही वृत्त वाचा

गौतम अदानींचा फायदा हेच भाजपचे ‘राष्ट्रहित’:संविधान वाचवण्याचा निर्णय पवारांच्या सहकाऱ्यांनी घ्यायला हवा होता- संजय राऊत

भाजपच्या लोकांनी राष्ट्रहिताच्या गोष्टी करू नयेत; त्यांचे हित केवळ गौतम अदानी यांचा फायदा करणे आणि त्यांना सर्व काही ताब्यात देणे, हेच त्यांचे राष्ट्रहित आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने संविधान वाचवण्याचा निर्णय त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि वारसदारांनी घ्यायला हवा होता. सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता. या नेत्यांनी मोदी-शहांच्या पाठिंब्याचा जो निर्णय घेतला, तो फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारा नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.