Headlines

डिलिमिटेशनमुळे उत्तर-दक्षिण संघर्ष पेटणार: संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा डाव, दक्षिणेतील राज्यांवर मोठा अन्याय- राज ठाकरे – Raj Thackeray Statement On Delimitation Bill


डिलिमिटेशन विधेयकामुळे देशाच्या हाताला काय लागणार आहे? संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा हा डाव आहे. यामुळे भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणमध्ये महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ

.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हा दक्षिणेचाच भाग आहे; मुघलसुद्धा महाराष्ट्राला दख्खन म्हणत, तर इंग्रज डेक्कन असे म्हणत होते. दक्षिणेतील राज्यांवर हा सर्वात मोठा अन्याय असणार आहे. हे सगळे केंद्रशासित करणे आणि सर्व काही केंद्रावर अवलंबून ठेवण्याचा हा डाव आहे. अजून काही गोष्टी आहेत, त्यासुद्धा हळूहळू तुम्हाला समजतील.

पवारांची पहिली टीम एनडीएमध्ये गेल्याचे मी तेव्हाच म्हटले होते

राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार उठून ज्यावेळी भाजपसोबत गेले, त्यावेळी मी एक ट्विट केले होते की, पवारांची पहिली टीम एनडीएमध्ये रवाना झाली आहे, दुसरी लवकरच होईल; त्याचप्रमाणे हे सर्व काही झाले. मंत्रिमंडळ आणि मंत्रिपदाची जी चर्चा आहे, त्याबद्दल मला काही माहिती नाही. जनतेने ठरवले पाहिजे की निवडणूक कशी लढवली जात आहे. ठाण्यात शेवटच्या एका तासात 80 ते 85 हजार मतदान झाल्याची बातमी समोर आली आहे. हे शक्य आहे का? पण ते शेवटच्या एका तासात झाले आणि आता बाहेर आले. मी 2018 पासून हे बोलतो आहे. मला मते मिळत आहेत, पण ती अशा प्रकारे कापली जात आहेत.

माझा निवडणूक आयोगावर विश्वासच नाही

राज ठाकरे म्हणाले की, महायुतीला 288 पैकी 232 जागा मिळाल्या तरी महाराष्ट्रात कुठेही जल्लोष झाला नाही; सर्व ठिकाणी शांतता होती, हे कशाचे द्योतक आहे? चोऱ्यामाऱ्या करत मिळवलेली ही सत्ता आहे, हे त्यांनासुद्धा माहिती आहे. माझा निवडणूक आयोगावर आता विश्वासच राहिलेला नाही. ज्या प्रकारचा कारभार सुरू आहे, त्यानुसार त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

हे ही वृत्त वाचा

गौतम अदानींचा फायदा हेच भाजपचे ‘राष्ट्रहित’:संविधान वाचवण्याचा निर्णय पवारांच्या सहकाऱ्यांनी घ्यायला हवा होता- संजय राऊत

भाजपच्या लोकांनी राष्ट्रहिताच्या गोष्टी करू नयेत; त्यांचे हित केवळ गौतम अदानी यांचा फायदा करणे आणि त्यांना सर्व काही ताब्यात देणे, हेच त्यांचे राष्ट्रहित आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने संविधान वाचवण्याचा निर्णय त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि वारसदारांनी घ्यायला हवा होता. सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता. या नेत्यांनी मोदी-शहांच्या पाठिंब्याचा जो निर्णय घेतला, तो फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारा नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.