Headlines

सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51, त्र्यंबकमध्ये कुशावर्तावर उभारणार 31 फुटी नवी रचना




२०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या ध्वजस्तंभांचे पारंपरिक रूप या वेळी बदलेल. नाशिकच्या रामकुंडावर ५१ तर आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फुटी व नवीन घाटावर ५१ फुटी ‘अमृतमंथन’ ध्वजस्तंभ साकारण्यात येतील. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ कोटी ९ लाख रुपयांचा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. पारंपरिक ध्वजस्तंभ या संकल्पनेला आध्यात्मिक संदर्भ देण्यात आला आहे. नाशिकचा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ आणि त्र्यंबकचा पुरोहित संघ यांच्या संकल्पनेतून या ध्वजस्तंभांवर समुद्रमंथन आणि त्यातून प्राप्त १४ रत्नांची हुबेहूब प्रतिकृती कोरली जाईल. स्तंभाच्या तळाशी गणपती व कमळाचे शुभचिन्ह असेल, तर शिखरावर भगवान विष्णूंचे वाहन असलेली ‘गरुड’ देवता विराजमान असेल. कुंभमेळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. ६ मे रोजी विशेष गाेदा आरती साेहळा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने ६ मे रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ काेविंद याच्या उपस्थितीत विशेष गोदा आरती सोहळा हाेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही निमंत्रित आहेत. स्टीलच्या पाइपवर पितळी नक्षीकाम तीन ठिकाणी हे ध्वजस्तंभ उभारले जाणार आहेत. भक्कमपणासाठी आतून ‘स्टेनलेस स्टील ३१६ ग्रेड’चा पाइप आणि बाहेरील बाजूने पितळी नक्षीकाम असे याचे स्वरूप असेल. साकारणार समुद्रमंथनातून प्राप्त १४ रत्नांची काेरीव मालिका हिंदू धर्मग्रंथांतील संदर्भानुसार समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या १४ रत्नांची मालिका स्तंभावर खालून वरच्या दिशेने कोरली जाईल. यामध्ये हलाहल विष, कामधेनू गाय, उच्चैःश्रवा अश्व, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, रंभा (अप्सरा), लक्ष्मीदेवी, वारुणी (मदिरा), चंद्र, धन्वंतरी, पारिजात वृक्ष, पांचजन्य शंख आणि सर्वात वरती अमृत कलश यांचा समावेश असेल. हे कोरीव काम स्तंभाला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य प्राप्त करून देईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *