![]()
प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील ननाशी जवळील बाडगीचापाडा परिसरात बिबट्यांचा वावर दहशतीचा विषय बनला आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे हे क्षेत्र बिबट्यांचे हॉटस्पॉट ठरत आहे. मंगळवारी पहाटे ८ ते १० महिने वयाचा नर बिबट वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. आठवडाभरात या एकाच ठिकाणाहून पकडलेला हा तिसरा बिबट्या आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने बाडगीचापाडा येथे तत्काळ पिंजरा लावला. दोन दिवसांनंतर मंगळवारी पहाटे हा नर बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ असताना पिंजऱ्यात अडकला. याच ठिकाणी २३ व २४ एप्रिल रोजी लोखंडी पाईपलाईनमध्ये ८ ते १० महिने वयाचे एक नर व एक मादीचे बछडे अडकले होते. आता त्याच वयोगटातील तिसरा बिबट्या सापडल्याने, एकाच मादीची ही सर्व बछडे असावीत, असा अंदाज व्यक्त होत आहे. दिंडोरी | परमोरी परिसरात काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. मंगळवारी रात्री सात वाजेच्या सुमारास हा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. परमोरी येथील दत्तू जोपळे यांच्या शेतात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ६ दिवसांपूर्वी जोपळे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ असताना पिंजऱ्यात अडकला. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतले आहे. परिसरात दहशत चार महिन्यांपूर्वीही याच भागातील विहिरीत एक बछडा पडला होता. वारंवार बिबट्या जेरबंद होत असल्याने परिसरात मोठी दहशत आहे.
Source link
बाडगीचापाड्यात आठवड्यात तिसरा बछडा जेरबंद:एकाच मादीची तिन्ही बछडे असण्याचा अंदाज; शेतकऱ्यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण