![]()
कोरिया प्रजासत्ताकाच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासातर्फे ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ या जागतिक स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २८ जून २०२६ रोजी किंग सेजोंग इन्स्टिट्यूट येथे होणार आहे. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालय, कोरियन
.
कोरियाचे मुंबईतील उपवाणिज्यदूत क्येओंगबेओम किम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, या स्पर्धेद्वारे सहभागी विद्यार्थ्यांना कोरियाची भाषा, संस्कृती, इतिहास आणि समाज याबाबतचे ज्ञान सादर करण्याची संधी मिळेल. तसेच, कोरियाबद्दलची आवड वाढविणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘क्विझ ऑन कोरिया’ हा दक्षिण कोरिया सरकारचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम आहे.
जगभरातील कोरियन दूतावासांमार्फत या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या घेतल्या जातात. प्रत्येक देशातून एक विजेता अंतिम फेरीसाठी कोरियात सहभागी होतो. पुण्यातील प्राथमिक फेरीतील विजेता भारताचे प्रतिनिधित्व अंतिम फेरीत करणार आहे. अंतिम फेरीतील स्पर्धकांना कोरियन संस्कृतीचा अनुभव घेण्यासह तेथील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल.
या उपक्रमामुळे भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास किम यांनी व्यक्त केला. भविष्यातही सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एउंजू लिम यांनी स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती दिली. नोंदणी सुरू झाली असून, इच्छुकांनी @s.korea.in.mumbai या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी mumbai@mofa.go.kr या ई-मेलवर किंवा ९८२०२७२७९१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.