Headlines

भोंदू अशाेक खरातला शिर्डी पोलिस घेणार ताब्यात:पत्नीचा जामीन फेटाळला, काही बड्या धेंडांची नावे उघड होण्याची दाट शक्यता




शिर्डीतील जमीन फसवणूक व खासगी सावकारी प्रकरणात अडकलेल्या भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिस ताब्यात घेणार आहेत. सध्या तो नाशिक एसआयटीच्या ताब्यात असून कायदेशीर प्रक्रियेसाठी सोमवारी (४ मे) पोलिसांचे पथक नाशिकला रवाना होईल. याप्रकरणी खरात, त्याची पत्नी कल्पना व इतर तिघांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आरोपी कल्पना हिने अटक टाळण्यासाठी राहाता न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून पोलिसांच्या पथकांनी तिचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासात आता आणखी काही बड्या धेंडांची नावे उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *