![]()
लायन्स झोन सोशलचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये झोन चेअरमन शशी मुरारका यांनी डॉ. मनोज अग्रवाल यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड प्रांतपाल अश्विनकुमार बाजोरिया यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. झोन ६ मध्ये ४ क्लबनी भाग घेतला होता. यामध्ये लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन, लायन्स क्लब ऑफ अकोला सफायर, लायन्स क्लब ऑफ अकोला यांनी भाग घेतला. उद्घाटन प्रांतपाल अश्विनकुमार बाजोरीया यांनी केले. मुख्य अतिथी म्हणून माजी गृहमंत्री डॉ. रणजित पाटील, डिस्ट्रिक्टची प्रथम महिला वैशाली बाजोरीया, अॅड. बी. के. गांधी, विजयकुमार तोष्णीवाल, माजी प्रांतपाल वसंत खंडेलवाल, रमाकांत खेतान, प्रोजेक्ट इंचार्ज डॉ. कैलाश मुरारका, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते. जयपूर फुटमूळे रुग्णांना नवीन जीवन चांगल्या तऱ्हेने जगण्यास मदत मिळते. प्रांतपाल अश्विनकुमार बाजोरीया यांनी रुग्णांची विचारपूस केली. कार्यक्रमात माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल तसेच महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष यांनी ५० वर्षाची विधी व्यवसायात सेवा दिल्याबद्दल अॅड. बी. के. गांधी यांचा सत्कार करण्यात आला. सुभाष चांडक, प्रकाश आनंदाणी, महेश मनवाणी, किशोर कापडे, दयाराम रोहडा, सुनील जेसवानी, शशी मुरारका, अनिता मालविया, डॉ. तारा माहेश्वरी, सचिन शर्मा, घनश्याम जोशी, कन्नूभाई सायानी, डॉ. दीपक केळकर, डॉ. वर्षा अग्रवाल, शोभा राठी, श्यामसुंदर साधवानी, अमित अग्रवाल, नरेश अग्रवाल, सुरेश बुंदेले, रतन लालवानी, डॉ. हेमंत जोशी, राहूल सावजी, नरेन्द्र भाला, डॉ. पुजा खेतान, रजनीकांत बावीशी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. सुनंदा केळकर, रमेश बाहेती यांनी केले. आभार अनिता मालवीया यांनी मानले.
Source link
लायन्स क्लबतर्फे गुणवंतांचा केला सन्मान:डॉ. मनोज अग्रवाल यांचा बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने करण्यात आला गौरव