Headlines

राज्यातील शिक्षकांसाठी आता दरवर्षी 50 तासांचे प्रशिक्षण असेल अनिवार्य:राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत राज्य सरकारचा मोठा निर्णय



राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील तरतुदींनुसार आता राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना

.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे ही या प्रशिक्षणाची राज्यस्तरावरील मुख्य संस्था असेल. दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रशिक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, जेणेकरून शिक्षकांना त्यांच्या अध्यापनाचे नियोजन करता येईल. शिक्षकांची उपस्थिती आणि प्रगती विद्या समीक्षा केंद्राच्या डॅशबोर्डमार्फत ट्रॅक केली जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि प्रगत अध्यापनशास्त्रासारख्या विषयांचा समावेश

या प्रशिक्षणात प्रामुख्याने नवीन शैक्षणिक संरचना (५+३+३+४), पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, समावेशक शिक्षण, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि प्रगत अध्यापनशास्त्र यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश असेल. अनावश्यक प्रशिक्षणांमुळे शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये आणि त्यांना प्रत्यक्ष अध्यापनासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा, याची दक्षता घेण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या किंवा अर्धवट प्रशिक्षण सोडणाऱ्यांवर नियमानुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.एआय डिजिटल साक्षरता आणि आधुनिक अध्यापन पद्धतींद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

‘विद्या समीक्षा केंद्रा’द्वारे लक्ष ठेवणार

राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांसाठी वार्षिक ५० तासांचे व्यावसायिक प्रशिक्षण आता बंधनकारक आहे. याचे नियोजन SCERT, पुणे तर्फे केले जाईल. ‘विद्या समीक्षा केंद्रा’द्वारे शिक्षकांच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आता याची अंमलबजावणी कशी होते याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

१० तासिका पूर्ण करता येणार

ऑफलाइन प्रशिक्षण (३० तास): यामध्ये प्रत्यक्ष कार्यशाळा आणि दरमहा होणाऱ्या शिक्षण परिषदांचा समावेश असेल. केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदांच्या माध्यमातून १० तासिका पूर्ण करता येतील.

ऑनलाइन प्रशिक्षण (२० तास): शिक्षकांना दीक्षा, स्वयम किंवा निष्ठा यांसारख्या अधिकृत शासकीय प्लॅटफॉर्मवरून दरमहा साधारण २ तासांचे ऑनलाइन कोर्सेस पूर्ण करावे लागतील, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *