Headlines

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबतच कलागुण आत्मसात करा- पोलिस निरीक्षक सानप:कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात‎




विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच ईतरही कलागुणांना आत्मसात करावे. पुढील काळ स्पर्धेचा, ताणतणावाचा असल्याने कला आपल्याला समाधान देते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी येथे केले. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक आर.बी. सानप तर प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ टेकाळे, कृषीतज्ञ चंद्रकांत क्षीरसागर उपस्थित होते. मान्यवरांचे प्रभारी प्राचार्य बी.सी. सरोज यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. विद्यालयाचा वार्षिक अहवालाचा परिचय वरिष्ठ शिक्षक एस.जी. वानखेडे यांनी करून दिला. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात बेस्ट स्काउट सर्वज्ञ वाघमारे, बेस्ट गाइड दिव्या कोळसे, बेस्ट एनसीसी कॅडेट देवेश जाधव, बेस्ट स्पोर्ट्स सानवी बढे, बेस्ट इन आर्ट रुचिता महालपुरे, बेस्ट परफार्मिंग आर्ट शार्दुल वालसंगे, विद्यालय टॉपर नंदिनी अणदूरे, बेस्ट जंबूरी अनुष्का पाटील, बेस्ट हाउस ऐकडमिक प्रथम विजेता नीलगिरी सदन, द्वितीय अरावली सदन यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कोविड काळात समाजसेवा व समुपदेशक कार्य केल्याबद्दल वरिष्ठ शिक्षक एस.जी.वानखेडे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सीबीएसई बोर्डमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनिल पाटील व जी.एन. काळे यांना सन्मानित करण्यात आले. संगीत शिक्षका डॉ.मनीषा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी सुंदर ते ध्यान, ऐगिरी नंदिनी, श्रीरामचन्द्र कृपालु भजमन, दिंडी, ऐतिहासिक माइम, इंग्लिश नाटक, जर्मन नाटक, हरवलेले बालपण, साउथ इंडियन अशी रंगारंग नृत्य सादर केली. सूत्रसंचालन नंदिनी अणदूरे व प्रांजल जाधव यांनी केले. आभार शिक्षक बी.यू.होळंबे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *