Headlines

पैठणमध्ये सर्व कार्यालये येणार एकाच छताखाली; वेळ, पैशांची होणार बचत:प्रशासकीय इमारत अंतिम टप्प्यात, लवकरच लोकार्पण‎




तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी उभारण्यात येत असलेल्या पैठण शहरातील नव्या प्रशासकीय इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. एकाच छताखाली सर्व कार्यालये ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असून लवकरच तालुकावासीयांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रशासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले. सध्या महसूल, पंचायत समिती, कृषी, पुरवठा, समाजकल्याण, निवडणूक विभाग तसेच तहसील कार्यालयाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना शहरातील वेगवेगळ्या भागात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नव्या प्रशासकीय इमारतीमुळे ही धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले की, आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून या इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला असून काम सध्या वेगाने सुरू आहे. अंतर्गत सजावट, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, पार्किंगसह विविध तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. या प्रशासकीय संकुलात नागरिकांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, डिजिटल सुविधा, स्वतंत्र विभागीय कक्ष तसेच सुटसुटीत सेवा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून नागरिकांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे. सर्व विभाग एकत्र आल्याने शासकीय कामकाजात समन्वय आणि पारदर्शकता वाढेल, असा विश्वास आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सध्या नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांत जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. आता सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. कृषी कार्यालयही होणार पैठणमध्ये अनेक वर्षांपासून तालुका कृषी कार्यालय जायकवाडी येथे कार्यरत आहे. मात्र नव्या प्रशासकीय इमारतीत कृषी कार्यालयालाही जागा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. विविध कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना होणारी धावपळ कमी होऊन कामे अधिक जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. इमारतीचे काम पूर्णत्वाकडे सुरू Ãइमारतीचे काम पूर्णत्वाकडे वेगाने सुरू आहे. लवकरच तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय कामकाज करून घेता येणार आहे. लवकर सेवेत दाखल होईल. – राजेंद्र बोरकर, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पैठण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *