![]()
शहराच्या स्वच्छतेचे मध्यवर्ती कंत्राट घेणारी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीच्या ८० कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचे थकित वेतन, ईपीएफ व ईएसआयसीचा लाभ मिळत नसल्याने मंगळवारी १२ मे रोजी अजानक कामबंद आंदोलन सुरू केल्यानंतर शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला. कारण, घंटागाडी चालक, स्वच्छता कर्मचारी, टिप्पर चालक, पर्यवेक्षक असे बरेच कर्मचारी संपावर गेले होते. उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती उर्वरित. पान ४ कोणार्कच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यानंतर स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांना माहिती दिली. मार्डीकर यांनीही आंदोलन स्थळी पोहोचून कर्मचाऱ्यांची व्यथा जाणली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी बोलावले. तेथे त्यांनी कंपनीला १० दिवसांत वेतन दिले नाही तर कारवाई करू, असा इशारा दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १० दिवसांत थकित वेतन दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर कामबंद आंदोलन स्थगित केले.
Source link
अधिकाऱ्यांचे आश्वासन; कोणार्कच्या कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला:10 दिवसांत थकित वेतनासह ईपीएफचा लाभ देण्याचे कंपनीचे आश्वासन