मंगळवार पॅटर्नच्या माध्यमातून राष्ट्रवादी जनतेचे प्रश्न सोडविणार:सटाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष खैरे यांची माहिती
बागलाण तालुक्यात नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दर महिन्याच्या एका मंगळवारी विशेष आढावा बैठक घेऊन ‘मंगळवार पॅटर्न’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केली. शहरातील राधाई मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खैरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री…