Headlines

Admin

कर टाळण्यासाठी खासगी जागेमध्ये अनधिकृत पत्राशेड बांधून व्यवसाय:2 हजारांवर विनापरवाना पत्रा शेड, मनपाकडून फक्त सर्वेक्षण, कारवाई नाही

अहिल्यानगर शहरात व विशेषतः उपनगर भागात मोकळ्या खासगी जागांवर पत्र्याचे मोठे शेड उभारून व्यावसायिक दुकाने, हॉटेल, शोरुम थाटण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल दोन हजारांहून अधिक अशी पत्र्याची शेड असल्याचे व यापैकी बहुतांश बांधकामे ही महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्याचे समोर आले होते. महापालिकेचा मालमत्ता कर व…

Read More

मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली:5 चिमुकल्यांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक कोसळल्याने पाच निष्पाप लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे. ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम…

Read More

नगर शहरात लवकरच होणार अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स:पदक विजेत्या खेळाडूंचा आ. जगताप यांच्याकडून सत्कार‎

नगरचे खेळाडू विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक पटकावून अहिल्यानगरचे नावलौकिक उंचावत आहे. अशा यशस्वी खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. शहराच्या विकासाच्या बरोबरीने क्रीडा क्षेत्रही समृद्ध होणे आवशयक आहे. यासाठी सतत पाठपुरावा केल्याने राज्य सरकारकडून नगरमधील वाडिया पार्क स्टेडीयम व मैदानाच्या नूतनीकरणासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी…

Read More

सलग 300 रविवार शहरात राबवले स्वच्छता अभियान:धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा सलग ३०० रविवार स्वच्छतेचा विक्रम

धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाने रविवारी ऐतिहासिक टप्पा गाठला. सलग ३०० व्या रविवारी भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मंदिर परिसरातील सुमारे पाच ते सहा टन कचरा, प्लास्टिक, झुडपे आणि गवत हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, धर्मवीर युवा…

Read More

विकासाचा गाजावाजा करणाऱ्यांनी पडलेला विकास पाहावा:मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिंदेंवरही साधला निशाणा

मुंबई-पुणे प्रवासातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर…

Read More

लुडो जिंकला अन् तरुणाचा खून:हल्लेखोराने केले चाकूने वार

लुडोचा खेळ जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या तरुणाचा किरकोळ वादातून चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी ४ जुलैला रात्री सुमारे अकरा वाजता गर्ल्स हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने तीनही आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींत गोलू ऊर्फ शेख इम्रान शेख महमूद (२८, रा. यास्मिननगर, ह. मु. यवतमाळ), शेख अमीन शेख…

Read More

संत्रा, मोसंबी मृग बहार; अधिक ताणाने फुलगळीचा धोका:तीव्र उन्हाळ्यामुळे झाडांना अधिक ताण

अकोला सध्याच्या बदलत्या हवामानात संत्रा व मोसंबी बागांच्या मृग बहाराचे व्यवस्थापन करणे फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. मृग बहार पावसाळ्यातील योग्य हवामान व तापमानावर अवलंबून असतो. या बहारात रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याने फळगळ कमी होते. मात्र, यावर्षी विदर्भात किमान साडेतीन महिने कडक उन्हाळ्यामुळे बागांना अधिक ताण बसला. यामुळे बागांमध्ये फुलगळ किंवा फळगळ…

Read More

वरुणराजाची हुलकावणी!:महिनाभरानंतर राहुरीकरांना रिमझिम पावसाने दिलासा

राहुरी तालुक्यात तब्बल एका महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र आजही कायम आहे. मागील आठवड्यात पावसाने किरकोळ हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून रिमझिम पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाच्या ओलीवर तालुक्यातील अनेक…

Read More

अकलूजमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावणात स्वागत:अभिषेक, पाद्यपूजनासह विविध कार्यक्रम उत्साहात

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेअंतर्गत महाराजांच्या पावन पादुकांचे अकलूज येथे शनिवारी सायंकाळी भक्तिमय वातावरणात आणि वाद्यांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. संपूर्ण महाराष्ट्राची परिक्रमा करून अखेरीस अक्कलकोट येथे पोहोचणारा हा पालखी सोहळा तब्बल नऊ महिन्यांचा असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूज येथे दाखल झाला. लवंग (पंचवीस चार) येथील…

Read More

अर्जुन कपूरच्या बहिणीचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू:अंशुला कपूरच्या मेहंदी समारंभात सोनम, जान्हवी आणि वरुणसह अनेक स्टार्स पोहोचले

चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर आज म्हणजेच 6 जुलै रोजी लग्न करत आहे. ती तिचा दीर्घकाळचा प्रियकर रोहन ठक्करसोबत लग्न करणार आहे. लग्नापूर्वी तिच्या घरी प्री-वेडिंग विधी सुरू झाले आहेत. माता की चौकीनंतर अंशुलाची मेहंदी सेरेमनी आयोजित करण्यात आली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत….

Read More