धीरेंद्र शास्त्रींचे आवाहन: 'चारपैकी एक मूल संघाला द्या':लोकसंख्या वाढीच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
नागपूर येथे बागेश्वरधामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी देशभक्तीचा संदेश देताना ‘चार मुले जन्माला घाला आणि त्यापैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,’ असे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेद्वारा उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा मंदिर’च्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शास्त्री यांनी…