पुण्यात डिलिव्हरी बॉयच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार:पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न, एकावर गुन्हा दाखल
पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील संत गाडगे महाराज वसाहतीत पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात सौरभ किशोर गायकवाड (वय २३, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याने कोरेगाव पार्क…