Headlines

Admin

चिखलदऱ्यात रुजणार ‘मधुपर्यटन' संकल्पना:आमझरीच्या मधाला नव्या वाटा मिळवून देण्यासाठी झटणार 3 संस्था

मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या मेळघाटमधील आमझरीचे मध आता सर्वदूर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी तीन संस्थांनी आपसात सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एमओयू झालेल्या या तीन संस्थांमध्ये ग्रामपंचायत, वन विभाग व खादी-ग्रामोद्योग महामंडळाचा समावेश आहे. हा ऐतिहासिक एमओयू जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल भवनात पार…

Read More

बार्शीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी:विरोधकांचे पक्षपातीपणाचे आरोप, सत्ताधाऱ्यांकडून कामांचे समर्थन‎

येथील पुतळा पार्क परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी आता भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. बार्शी नगर परिषदेच्या शुक्रवारी (दि. १०) झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दिवाणी न्यायालयासमोर…

Read More

पहिल्या टप्प्यात 429 शाळांची पटपडताळणी,:'आधार''मुळे बोगस पटसंख्येला बसणार चाप; अकरा तालुक्यात पथकांची नियुक्ती‎

सोलापूर शहर व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित साडेचार हजार शाळांमध्ये शनिवार (दि.११) पासून पटपडताळणी व संकलित मूल्यमापन परीक्षा एकाच वेळी सुरू झाली. या प्रक्रियेत आतापर्यंत शहरातील ३०९ शाळांपैकी १२० शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी झाली. तर, जिल्हा परिषदेच्या २७७३ पैकी ४२९ शाळांची पटपडताळणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.​ या मोहिमेसाठी महापालिकेद्वारे ४४ कर्मचाऱ्यांची विशेष…

Read More

देशात सुमारे अडीच कोटी यूट्यूब चॅनेल:फक्त 30 लाखच प्रोफेशनल, अनेक चुकीचा सल्ला किंवा कॉपी-पेस्ट केलेला मजकूर पसरवत आहेत

देशात सुमारे 2.5 कोटी सक्रिय यूट्यूब चॅनेलपैकी फक्त 30 लाख व्यावसायिक आहेत, तर उर्वरित कोट्यवधी चॅनेलपैकी अनेक कोणत्याही नियमनाशिवाय किंवा कमाईशिवाय चुकीचा सल्ला किंवा कॉपी-पेस्ट केलेला मजकूर पसरवत आहेत. इन्फ्लुएंसर ट्रस्ट रिपोर्टनुसार, देशात यूट्यूबचे दरमहा सुमारे 50 कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत. आता हे केवळ मनोरंजन नाही, तर एक डॉक्टर, मेकॅनिक, जिम ट्रेनर आणि कायदेशीर सल्लागार…

Read More

अतिक्रमण हटवून माळीवाडा वेशीचे संवर्धन करा:भारतीय पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निर्देश‎

शहराच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक माळीवाडा वेशीभोवती पडलेला अतिक्रमणाचा विळखा तातडीने दूर करण्याचे निर्देश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले आहेत. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, ती भावी पिढीसाठी जतन करणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे पत्र औरंगाबाद मंडळाच्या अधीक्षण पुरातत्त्वविदांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. या पत्रात माळीवाडा गेटच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देण्यात आली आहे. निजामशाही…

Read More

जिल्हा रुग्णालयात मोफत फिजिओथेरपी:दरमहा होणारा 15 हजारांचा खर्च वाचेल, ऑगस्टपासून कॅन्सरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 10 बेडचा स्वतंत्र कक्ष‎

. जिल्हा शासकीय रुग्णालयात आता कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिजिओथेरपी उपचार सुरू करण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे उपचार प्रत्यक्षात सुरू होणार असून, यासाठी १० बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. यामुळे खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी होणारा १० ते १५ हजार रुपयांचा मासिक खर्च वाचणार आहे. सध्या जिल्ह्यात कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात दरवर्षी…

Read More

समता, बंधुता, न्यायासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा‎:महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर्श घेत शिक्षण घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

सारसनगर येथील दामोदर विधाते मास्तर विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचा, विचारांचा व समाजप्रबोधनाच्या संदेशाचा जागर करण्यात आला. कार्यक्र . नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाची क्रांती घडवून आणली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया…

Read More

दिल्ली-यूपीमध्ये एका दिवसानंतर तापमान 40°C च्या वर जाईल:मनालीमध्ये बर्फवृष्टी, पारा -7 अंशांवर पोहोचला; जम्मूमध्ये वादळ

देशभरात उष्णता वाढत आहे. हवामान विभागाच्या मते, उत्तर-पश्चिम भारतात तापमान 6 ते 8 अंशांपर्यंत वाढू शकते. मात्र, शनिवारी संध्याकाळी अटल बोगदा आणि मनालीच्या आसपासच्या परिसरात हलकी बर्फवृष्टी झाली. शनिवारी रात्री मनालीमध्ये तापमान -7 अंशांपर्यंत खाली आले. तर, उत्तर प्रदेशात लखनऊसह अनेक ठिकाणी रविवारी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकते. दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 34.7…

Read More

आजच्या पिढीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करण्याची गरज:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विविध संस्था संघटनांच्यावतीने अभिवादन‎

. तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या समाजाला सर्वाधिक गरज आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी जे कार्य केले, ते अत्यंत…

Read More

दूधपंढरीत चारा टंचाईची झळ; मुरघासाचा खर्च आवाक्याबाहेर!:जिल्ह्यात 16 लाख पशुधन, 58 हजार हेक्टरवर मका‎

उन्हाची तीव्रता वाढत असतानाच, जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध चाऱ्याचे भाव कमालीचे वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर सुमारे १६ लाखांवर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालकांनी मुरघासाच्या बॅगा भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, वाढत्या दरामुळे एका हजार ते अकराशे किलोच्या बॅगेचा खर्च चार ते पाच हजारांवर पोहोचला आहे. राज्यात दूधउत्पादनात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर…

Read More