नाशिक येथे ढगफुटीचा इशारा:त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, 24 तासांत 300mm पाऊस होण्याचा अंदाज; रत्नागिरीत भूस्खलन, घर कोसळले
महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ तासांत ३०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दरम्यान ढगफुटीसदृश पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर…