वांगचुक यांच्या उपोषणाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा:सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन
नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशातील तरुणांचे भवितव्य अंधारात आले आहे. याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १६ दिवसांपासून प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असून हे सरकार मात्र पूर्णपणे असंवेदनशील झाले आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सोनम…