Headlines

Admin

कोठडीतील आरोपीला घरचे जेवण देणे पडले महागात:कळमनुरीतील पोलीस जमादार निलंबित, एस.पी. डॉ. नीलाभ रोहन यांचे आदेश

कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला घरचे जेवण देणे पोलीस जमादाराला चांगलेच महागात पडले असून संबंधित जमादाराला सोमवारी ता २५ निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले आहेत. कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत कळमनुरी शहरांमध्ये दिनांक 23 मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.या प्रकारात तातडीने आरोपींची…

Read More

युद्धाच्या 3 महिन्यांत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला रुपया:जाणून घ्या- याचा तुमच्या दैनंदिन खर्चांवर, गुंतवणुकीवर, प्रवासावर आणि ईएमआयवर काय परिणाम होतो?

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय रुपयावर दबाव वाढतच चालला आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ₹95.23 च्या पातळीवर बंद झाला. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या या युद्धानंतर अवघ्या तीन महिन्यांत रुपया सुमारे ₹5 ने घसरला आहे, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर, घरगुती बजेटवर आणि गुंतवणुकीवर थेट परिणाम होणार आहे. युद्धानंतर 3 महिन्यांत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला रशिया-युक्रेननंतर आता…

Read More

नरभक्षक वाघीण जेरबंद, ब्रह्मपुरी वनविभागाला यश:चार बछड्यांना पकडण्यासाठी 'मिशन' सुरू, पीडित कुटुंबांना आर्थिक मदत

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत गुंजेवाही परिसरात चार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नरभक्षक वाघिणीला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. या वाघिणीच्या चार बछड्यांचा शोध अजूनही सुरू असून, त्यांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनक्षेत्रात मचाणे उभारून जिवंत भक्ष्य (बेट) लावण्यात आले आहे. बछड्यांना पकडण्याची रीतसर परवानगी मिळाली आहे. बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. रविकांत खोब्रागडे आणि नेमबाज अजय मराठे…

Read More

औंढा नागनाथ येथील मंदिरात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू:रांजळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

औंढा नागनाथ येथे कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. श्री नागनाथ मंदिरात सुरक्षा पोलीस म्हणून तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर विश्वनाथ कदम (५६) रा. रांजाळा) यांचे सोमवार, २५ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ज्ञानेश्वर कदम हे मागील ११ महिन्यांपासून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस…

Read More

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:अभिनेत्री नीलम शिर्के यांची अखेर माघार; राजकीय शिरकावाच्या चर्चांना पूर्णविराम

तब्बल 10 वर्षांनंतर पार पडत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सध्या मोठा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांनंतर आता नीलम शिर्के यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत…

Read More

AIADMK MLAs Resign, Join TVK; Support Govt in Floor Test

चेन्नई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडूमध्ये AIADMK ला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या तीन बंडखोर आमदारांनी सोमवारी राजीनामा दिला. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये मरगथम कुमारवेल, पी. सत्यभामा आणि एस. जयकुमार यांचा समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष जेसीडी प्रभाकर यांनी तिन्ही आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. अध्यक्षांना भेटल्यानंतर तिन्ही आमदार TVK नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आधव अर्जुना यांना…

Read More

दीपक कुमठेकर महावितरणच्या मुख्य अभियंतापदी रुजू:छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचा पदभार स्वीकारला; पवनकुमार कछोट यांची बदली

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी दीपक कुमठेकर यांनी सोमवारी (२५ मे) पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नाशिक येथील महावितरणच्या नेटवर्क प्लॅनिंग सेलचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. श्री. कुमठेकर हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी विपणन…

Read More

NEET पेपरफुटी प्रकरण:अमित देशमुखांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले- यात माझे नाव जोडणाऱ्यांचा हेतू शुद्ध नाही

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर, त्यांचे काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाषण करतानाचे आणि देशमुख कुटुंबीयांशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय टीका-टिप्पणी होत असून, या पेपरफुटीमुळे राज्यभरात नावाजलेला लातूर पॅटर्नही बदनाम होत असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आता लातूरचे आमदार आणि…

Read More

पालघरमध्ये एसीबीची मोठी कारवाई:45 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल महिला अधिकारी रंगेहात जाळ्यात; नवी मुंबईतही मोठी कारवाई

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई सुरू ठेवत शिपायापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीच्या या कारवाईचा धाक निर्माण झाला असला, तरी लाचखोरीचे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून, पालघर एसीबीने पेल्हार ग्रामपंचायतीच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील…

Read More

अवकाळी पावसाने वेरूळला झोडपले!:अर्धा तास चाललेल्या पावसामुळे लेणी परिसर जलमय, पर्यटकांची तारांबळ; बळीराजा पुन्हा चिंतेत

वेरूळ व परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या काळ्या ढगांसह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली आणि पाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे संपूर्ण वेरूळ परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या पावसामुळे…

Read More