परमेश्वराला साधेपणा, निष्कलंकपणाअसलेला भक्त प्रिय- किशोर महाराज:एरंडोल येथील पायी दिंडीला 32 वर्षे पूर्ण, कन्नड येथे वारकऱ्यांचा मुक्काम
अलीकडच्या काळात समाजात दिखाऊ आणि भपकेबाज भक्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, अशा बाजारू स्वरूपाच्या भक्तीने परमेश्वर प्रसन्न होत नाही. देवाला निव्वळ साधेपणा, निष्कलंकपणा आणि मनातील खरेपणा असलेला भक्तच प्रिय असतो, असे प्रतिपादन कीर्तनकार किशोर महाराज कासोदेकर यांनी केले. श्री राजे गोविंद आश्रम व गोसेवा संस्थान, एरंडोल (जळगाव) येथील पायी दिंडीला यंदा ३२ वर्षे…