Headlines

Admin

वेळकाढू कारभाराविरोधात महावितरण कार्यालयाला घेराव:नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात व्यक्त केली नाराजी

तिवसा शहर व तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांच्या नेतृत्वात बुधवारी १ जुलैला महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता व शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घालत त्यांच्याच दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेत महावितरण प्रशासनाविरोधात…

Read More

अजब आदेश! ट्रक वाहतुकीला‎मुभा पण एसटीची चाके थांबवली‎:विद्यार्थ्यांच्या चक्काजामसमोर नमले प्रशासन, 2 तासानंतर बस सुरु‎

रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या महत्त्वाच्या मार्गावर एसटीच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. परंतु त्याचवेळी ट्रक मात्र सुसाट धावत होते. या अफलातून आदेशामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी काँग्रेसच्या मदतीने चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे अडचणीत आलेल्या तालुका प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांचा रोष शांत केला. त्यानंतर लगेच नगरपालिकेचे…

Read More

धार्मिक:सलग सुट्ट्या, वटपौर्णिमेमुळे अक्कलकोट नगरीत 1 लाखांहून अधिक भक्तांचे दर्शन

प्रतिनिधी | अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सलग सुट्यामुळे व वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रविवारी पहाटेपासून दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. शुक्रवारी शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह…

Read More

50 वर्षांपूर्वीची सह-शिक्षण शाळा निघाली मुलांची शाळा:प्रशासनाने न कळवता बदल केला, 120 मुलींचे प्रवेश रद्द झाले

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कलना क्रमांक 2 ब्लॉकमधील बैद्यपूर विद्यापीठ गेल्या 50 वर्षांपासून सह-शिक्षण (मुली आणि मुले) शाळा म्हणून कार्यरत आहे, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी नोंदणीसाठी शिक्षण पोर्टलवर अर्ज केला, तेव्हा असे समोर आले की बैद्यपूर विद्यापीठाचे मुलांच्या शाळेत रूपांतर करण्यात आले आहे. बदलाची माहिती प्रशासनालाही नाही या बदलाची माहिती स्वतः…

Read More

पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा झाला गौरव:राज्य, जिल्हा, तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान‎

बार्शी तालुका कृषी विभाग व बार्शी पंचायत समिती कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै रोजी बार्शी पंचायत समिती येथे कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कृषी दिन कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती बार्शीचे उपसभापती संतोष निंबाळकर, खडकलगावचे माजी सरपंच दीपक रोंगे, बार्शी बाजार समितीचे माजी संचालक वालचंद मुंडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवसे, माजी…

Read More

स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ पंढरीत अर्धनग्न आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरणवर मोर्चा‎

राज्य शासनाने वीज ग्राहकांसाठी प्रस्तावित केलेल्या स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात पंढरपूर शहरात बुधवारी अनोखे आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले. शिवक्रांती युवा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कंदील हाती घेऊन आणि अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत महावितरण प्रशासनाचा निषेध केला. पंढरपूर शहरात महावितरण कडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात आहेत,…

Read More

"एआय'मुळे नोकरी जाणार नाही, पण न शिकल्यास बेरोजगार व्हाल:अमेरिकेतील कॉर्पोरेट लीडर डॉ. आकाश खुराणांचा मंत्र

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणत्याही क्षेत्रात माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. उलट तो आपली निर्णयक्षमता आणि उत्पादकता वाढवणारे एक साधन आहे. त्यामुळे एआय माणसाला हटवणार नाही, तर एआयचा हुशारीने वापर करणारा माणूस तुमची नोकरी सहज हिरावून घेईल,असा सल्ला जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वेस्को’ (यूएसए) कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आकाश खुराणा यांनी दिला….

Read More

अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था जम्मू येथून रवाना:फक्त नोंदणीकृत भाविकांना प्रवेश; बद्रीनाथमध्ये 13.92 लाख, केदारनाथमध्ये 13.68 लाख भाविक आले

जम्मूतील भगवती नगर यात्री निवास येथून गुरुवारी सकाळी 4 वाजता अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था रवाना झाला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भाविकांना रवाना केले. भाविकांनी ‘बम-बम भोले’च्या जयघोषात बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी प्रस्थान केले. 57 दिवसांची यात्रा 3 जुलैपासून पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांनी सुरू होऊन 28 ऑगस्ट (रक्षाबंधन) पर्यंत चालेल. पहिल्या जत्थ्यात फक्त त्याच भाविकांना समाविष्ट…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट‎:कारवाईच्या भीतीने क्लिनिकला टाळे ठोकून कौठ्याचा बोगस डॉक्टर पसार

श्रीगोंदे तालुक्यातील कौठा परिसरात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बीएएमएसची बनावट पदवी लावून राजरोसपणे नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस बंगाली डॉ. सौरभ अधिकारी याने अखेर आपले “श्रीसान क्लिनिक’ बंद करून पळ काढला आहे. या अवैध कारभाराबाबत “दिव्य मराठी’मध्ये बुधवारी “सलाइन खुंटीला आयुष्य टांगणीला’ हे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाने याची दखल घेतली. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे आणि…

Read More

"डॉक्टर डे'' निमित्त‎सामाजिक बांधिलकी‎:"आयएमए'च्या डॉक्टरांनी अनामप्रेम संस्थेतील मुलांची केली मोफत तपासणी

‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), अहिल्यानगर शाखेच्या वतीने गांधी मैदान येथील अनामप्रेम संस्थेत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेतील मुला-मुलींची आरोग्य तपासणी करून डॉक्टरांनी त्यांच्यासोबत हा दिवस उत्साहात साजरा केला. यावेळी डॉक्टरांनी मुलांशी संवाद साधत त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शिबिरात आयएमएचे अध्यक्ष डॉ. धनंजय कुलकर्णी, सचिव डॉ….

Read More