एसटी महामंडळाचा मोठा निर्णय:'तीर्थाटन' योजनेत आता खासगी भागीदारी; मराठी तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी, प्रवाशांना एकाच तिकिटात सर्व सुविधा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला आता अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप मिळणार आहे. या योजनेत खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील भाविकांना अत्यंत किफायतशीर दरात सुरक्षित तीर्थयात्रा करता येणार असून, एसटीच्या उत्पन्नालाही मोठा हातभार लागणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री…